निफाड @८.४ अंश सेल्सियस ; द्राक्ष बागायतदार चिंतेत

0
नाशिक : उत्तर भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असणाऱ्या अवकाळी पाऊस आणि जोरदार  हिमवृष्टीमुळे निफाडसह नाशिकचा पारा कमालीचा घसरला असून द्राक्ष बागाईतदार मोठ्या संकटात सापडले असून सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात थंडी वाढलेली आहे. निफाड तालुक्यातील पारा आज कमालीचा खाली आलेला असून तापमान ८.४ अंश नोंदवण्यात आले आहे.
तर नाशिकचे १०.४ डिग्री सेल्सिअस तापमान नोंद झाली. उन्हाळा सुरु झाला तरी थंडी वाढलीच असल्याने द्राक्ष बागायतदार चिंतेत दिसून येत आहेत. या बदलत्या वातावरणात नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*