नितीश कुमार आज बहुमत सिद्ध करणार!

0

बिहार : नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आज (शुक्रवार) नितीश कुमारांना विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आधीच 132 आमदारांच्या समर्थनाचं पत्र राज्यापालांना दिलं आहे. मात्र, विधानसभेत नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे राजदचे आमदार नेमकी भूमिका काय असणार याकडेही सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, काल नितीश कुमार यांनी सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. तर भाजपचे सुशील मोदी बिहारचे नवे उपमुख्यमंत्री झाले आहेत.

LEAVE A REPLY

*