नाशिक @ 38 ; दुपारी निर्मनुष्य ; आरोग्यावरही परिणाम

0

नाशिक : गेल्या आठवड्यापासून नाशिकच्या तापमानातील वाढ सुरूच असून त्यामुळे दुपारच्या सुमारास उन्हाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी नाशिकचे तापमान 38 अंश इतके नोंदले गेले. अचानक वातावरण अतिउष्ण होवू लागल्याने दुपारच्या सुमारास रस्तेही निर्मनुष्य होत असल्याचे चित्र दिसत आहे.

नाशिकमध्ये गुरुवारी (दि.23) शहराचे कमाल 38.1 अंश इतके नोंदविण्यात आले तर शुक्रवारीही 38 अंश इतके तापमान कायम राहिल्याने उष्णता कायम होती. तापमान वाढीमुंळे उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. त्यामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यावर व्यवसाय करणारे विक्रेते, नागरिकही गायब होतांना दिसत आहेत. ज्या प्रमाणात तापमान वाढत आहे त्या प्रमाणात गर्दी कमी कमी होत असल्याचे चित्र पहायला आहे.

या उन्हामुळे पशुपक्ष्यांचेही हाल होत असून स्वयंसेवी संस्थांकडून या पक्ष्यांना पाण्याचे भांडे पुरविण्याची सोय केली जात आहे. शिवाय सामाजिक जाणीवेत ून नाशिक शहरातही पाणपोया थाटण्यात आलेल्या आहेत. शहरातील सर्वच महत्वाच्या कोपरयांवर पाणपोया दिसू लागल्या आहेत. याशिवाय मेन रोड, गंगापुर रोड, कॉलेज रोड, नाशिक रोडवरील सर्वच दुकानांमध्ये ग्राहकांसाठी पाण्याचे उपलब्ध करून देण्याची माणुसकी व्यापारयांकडून दाखविली जात आहे.

दरम्यान उन्हाचा तडाखा सतत वाढत असल्याने पुढील काही दिवसात वातावरणातील गर्मी आणखी वाढणार असल्याचे संकेत वेधशाळेे दिले आहेत. उष्णता वाढल्यामुळे सावलीसाठी मागणी असलेल्या ग्रीन शेड कपडयाचीही मागणी वाढली आहे. केवळ शेतकरयांकडूनच नव्हे तर नाशिक शहरातील बंगलेधारक, नागरिक यांच्याकडूनही हा कपडा खरेदी मोठया प्रमाणात गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. बंगल्यांमधील झाडे वाचविण्यासाठीही नागरिकांची धडपड असून त्यासाठीही सावली करण्याचे काम काही ठिकणी सुरू आहे.

दरम्यान बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. वाढत्या उष्म्यामुळे ताप येणेविषयक आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 3 मे 2002 साली नाशिकच्या कमाल तपमानाचा पारा सर्वाधिक 43.9 अंश नोंदविला गेला होता. हा उच्चांक राहिला असून, गेल्या पंधरा वर्षांमध्ये नाशिकरांनी कधीही एवढा प्रखर उन्हाळा अनुभवला नाही; मात्र यावर्षी मार्च महिन्याचे सात दिवस शिल्लक असून, पारा 38 अंशांपर्यंत पोहचल्याने उन्हाची तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे.

गेल्या वर्षीही मार्च महिन्यात कमाल तपमानाचा पारा 38 अंशांच्या आसपास होता; मात्र त्यावेळी हवेचा वेग अधिक असल्याने शहरात उष्मा कमी जाणवत होता. यावर्षी हवेचा वेग कमी झाला असून, तपमानाचा पारा चढता असल्याने उन्हाच्या झळा अधिक प्रखर वाटू लागल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सध्या दिवस आणि रात्र हे प्रत्येकी बारा तासांचे आहे.
येत्या सात दिवसांत हवेचा वेग न वाढल्यास ढगाळ हवामान राहिल्यास पारा अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरुवारी सकाळी आकाशात ढग जमा झाल्याने तपमानात वाढ झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

*