नाशिक- मुंबई विमानसेवा देण्यास एअरइंडिया तयार

0

नाशिक, दि.25, प्रतिनिधी

नाशिक – मुंबई विमानसेवा सुरू  करावी ही अनेक दिवसांपासूनची उद्योजकांची मागणी पुर्ण होण्याची चिन्हे आहेत.

शिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरिग असोसिएशन अर्थात निमा संघटनेने भारतीय विमान प्राधिकरणाला 21 मार्च रोजी पाठविलेल्या पत्राला दोनच दिवसात ई मेलव्दारे उत्तर प्राप्त झाले.

त्यानुसार एअर इंडियाचे अध्यक्ष अनिल मेहता यांनी विमान सेवा सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.

अलायन्स एअर या  पुर्णपणे एअरइंडिया लिमिटेड कंपनीच्या मालकीच्या असलेल्या विमानसेवेव्दारे आम्ही नाशिक मुंबई विमानसेवा देण्यास तयार आहोत.

त्यासाठी नाशिक आणि मुंबई विमानतळावरील योग्य वेळ सुचिवावी असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत लवकर प्रतिसाद देण्याबाबत त्यांनी सूचना केली आहे. आता पुढील हालचाली अपेक्षित असून एअर इंडियाला सकारात्म प्रतिसाद दिल्यास लवकरात लवकर ही विमानसेवा सुरू होणे शक्य आहे.

LEAVE A REPLY

*