Video : नाशिक महापौर निवडणूक : भाजपच्या रंजना भानसी बिनविरोध ; काँग्रेस उमेदवाराची माघार

0

नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रंजना भानसी यांची बिनविरोध निवड झाली. कॉंग्रेसच्या उमेदवार आशा तडवी यांनी माघार घेतल्यामुळे  महापौरपदी भाजपच्या रंजना भानसी महापौरपदी बिनविरोध विराजमान झाल्या.

अशी झाली महापौरांची निवड : 

 • सकाळी : 11.05 वाजता कामकाजाला सुरवात..
 • 11.15 वाजता छाननी सुरु..
 • विरोधक तटस्थ राहिल्याने अर्धे सभागृह रिकामेच
 • भाजप नगरसेवकांना घातले भगवे फेटे
 • निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन आणि नगरसचिव प्रकाश वाघ यांनी केली कामकाजाला सुरवात
 • 11.20 पासून शिवसेना नगरसेवकांचे आगमन 11.23 पासून निवडीसाठी अधिकाऱ्यांनी दिला 15 मिनिटांचा वेळ
 • च्या दरम्यान भानसी यांनी काँग्रेस च्या आशा तडवी यांना माघारीसाठी विंनंती केली
 • त्यांनतर महापौर निवड बिनविरोध करण्याचे सोपस्कार पूर्ण
 • मिनिटांनी महापौरपदी रंजना भानसी यांची निवड झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
 • त्यानंतर उपमहापौर पदासाठीचे कामकाज सुरु करण्यात आले. दरम्यान यात शिवसेना,मनसे तटस्थ राहिले.

 • Video by : khandu jagtap

LEAVE A REPLY

*