नाशिक महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती – महापौरांचे संकेत

0

नाशिक : केंद्रात, राज्यात आणि आता महानगरपालिकेतही भारतीय जनता पार्टीची (भाजप) सत्ता असल्यामूळे विकासाला चालणा मिळणार आहे. 19 वर्षांपासून महानगरपालिकेत कर्मचारी भरती झालेली नाही. तसेच येणार्‍या काळात अनेक कर्मचारी निवृत्तदेखील होणार आहेत. ही संख्या मोठी असल्याने कर्मचाऱ्यांचा तुटवडा भरून काढण्यासाठी कर्मचारी भरतीबाबत लवकरच राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले. त्या दैनिक ‘देशदूत’मध्ये दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी बोलत होत्या.

यावेळी उपमहापौस प्रथमेश गिते, नगरसेवकर मुकेश शहानी यांची उपस्थिती होती. महापौर भानसी पुढे म्हणाल्या, शहरातील अनेक नागरीकांच्या तक्रारी घंटागाडीबाबात जास्त दिसून येतात त्यामूळे स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक हा आमचा अजेंडा असून शहरातील घणकचरा वेळेवर उचलला जावा तसेच यातील सातत्य टिकून रहावे यासाठी लवकरच योग्य ते निर्णय घेण्यात येणार आहेत.

शहरातील पार्कींगचा प्रश्न गंभीर आहे यावर बोलतांना त्या म्हणाल्या की, लवकरच पार्कींगचा प्रश्नाबाबत आम्ही बैठक बोलावली असून पार्कींगसाठी हक्काची जागा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासोबतच शहरातील गार्डन, महिलांच्या आरोग्यासाठी ग्रीन जीमची सोय लोकप्रतिनिधींच्या प्रभागानुसार करण्याचा विचार असून महापालिकेच्या मालकीची असणारी मोकळी जागा शहरातील अभियंत्यांच्या माध्यमातून सुधारण्यात येणार आहेत.

सध्या अनेकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आहे. त्यामानाने मनपा शाळांचा दर्जा सुधारलेला नाही. त्यामूळे नाशिक मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी ज्युनियर केजी पासून सातवी किंवा पाचवीपर्यंत आम्ही इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पुढील पन्नास वर्षांपर्यत पिण्याचा पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही या अनुषंघाने आम्ही वाटचाल करणार आहोत. महापालिकेच्या उत्पन्नाचा स्त्रोत वाढविण्यासाठीही घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीबाबत नव्याने नियोजन करण्यात येईल. तसेच स्वाईनफ्लू आटोक्यात आणण्यासाठी किंवा त्यापासून बचाव करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.

गोदावरी नदीचे पाणी सतत वाहते ठेवून नर्मदा नदीच्या धर्तीवर गोदावरी स्वच्छता करण्यात येणार असल्याचे महापौर भानसी यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते नाशिक विकासाबाबत सांगितले की, सरकार केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेत भाजपचे सरकार असल्याने विकासाला चालणा मिळणार आहे. तसेच नाशिक स्मार्टसिटी हा पहिला प्रयोग असेल त्यानंतर शहरात सीसीटीव्ही बसवले जातील. शहराची गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी आणि शहर भयमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. अनेक ठिकाणी जुन्या ड्रेनेज लाईन आहेत त्याही आम्ही लवकरच बदलणार असल्याचे गिते म्हणाले.

LEAVE A REPLY

*