नाशिक महानगरपालिका महापोैर पदासाठी आज अर्ज दाखल करणार

भाजपकडून रंजना भानसी तर कॉंग्रेसकडून आशा तडवी अर्ज दाखल करणार

0

नाशिक | दि. ८ प्रतिनिधी – महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा गुरूवार दि. ९ हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने महापौर पदाच्या उमेदवार रंजना भानसी व उपमहापौर पदाचे उमेदवार प्रथमेश गिते गुरूवारी आपला अर्ज दाखल करणार आहेत. तर कॉंग्रेसकडून आशा तडवी यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे.

भाजपकडून शक्तीप्रदर्शन करत गुरूवारी दोन्ही पदासांठी अर्ज भरले जाणार आहे. ही निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता असली तरी विरोधकांकडून निवडणुक बिनविरोध न होउ देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

महापालिका निवडणुकीत भाजपने ६६ जागा मिळवत बहुमत प्राप्त केले. महापौरपदासाठी बहुमतासाठी ६२ जागांची आवश्यकता असून भाजपने हा विजयी आकडा पार केला आहे. तर शिवसेना ३५ जागा घेवून दुस-या क्रमांकावर आहे. तर कॉंग्रेस,राष्ट्रवादी प्रत्येकी ६ तर व मनसेचे ५ नगरसेवक आहे. भाजपकडे बहुमत असल्याने महापौर व उपमहापौर हे भाजपचाच होणार हे स्पष्ट आहे. महापौर पदासाठी १४ मार्च

र्रोजी निवडणूक होत असून अर्ज भरण्यासाठी गुरूवार हा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून महापौरपदासाठी रंजना भानसी तर उपमहापौर पदासाठी प्रथमेश गिते यांचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. भाजपकडून यावेळी शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

आघाडी देणार उमेदवार
महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.कॉंग्रेसकडे आशा तडवी यांच्या रुपाने उमेदवार असून कॉंग्रेसकडून गुरुवारी त्यांचा अर्ज भरला जाणार आहे. कॉंग्रेस , राष्ट्रवादी, मनसेनेकडे बहुमत नसले तरी निवडणुक बिनविरोध होउ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शिवसेनेने मात्र रात्री उशिरापर्यंत आपली भुमिका स्पष्ट केलेली नाही. यासंदर्भात उशिरापर्यंत प्रमुख पदाधिकारयांची खलबत सुरू होती. मुंबई महापालिकेत भाजपने शिवसेनेला पाठींबा दिल्याने शिवसेनेचा विरोध आता मावळला आहे. मात्र शिवसेनेची नाशिकमध्ये भुमिका काय असेल हे उद्या दि.९ रोजी स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

*