नाशिक पं.स.मध्ये गावविकास कार्यशाळा ; सभापती ,सदस्यांचा पदभार सोहळा

0

नाशिक : नाशिक पंचायत समितीत नवनिर्वाचित सभापती, सदस्यांनी आज पदभार घेतला. त्यानंतर गावविकास कार्यशाळा झाली. त्यात पंचावार्षिक आराखडा सादर करण्यात आला.ग्राम स्वराज्य, गावविकासासाठी लोकसहभाग या संकल्पनेचे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळी 9 वाजता नवनिर्वाचित सभापती रत्नाकर चुंभळे यांच्यासह उपसभापती कविता बेंडकोळी आणि सदस्यांनी पुजाविधी करत पदभार घेत कामकाजाला सुरवात केली. यावेळी नुतन जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, माजी अध्यक्षा विजयश्री चुंभळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, अर्जुन टिळे, विष्णुपंत म्हैसधुणे, जि.प.सदस्य हिरामन खोसकर, यशवंत ढिकले, उदय जाधव, अर्पणा खोसकर, पंचायत समिती सदस्य ढवळू फसाळे, विजया कांडेकर, छाया डंबाळे, मंगेश सोनवणे, उज्वला जाधव, विजय जगताप, प्रकाश नन्नावरे, मनोहर बोराडे, शिवाजी चुंभळे, कल्पना चुंभळे, सचिन पिंगळे, तुकाराम खांडबहाले उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, संगणक ऑपरेटर यांची कार्यशाळा सभापती चुंभळे यांनी घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी स्मिता गुजराती, विस्तार अधिकारी सानप, पृथ्वीराज परदेशी, यशदाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्प अहवाल ऑनलाइन भरण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. शुभेच्छा देण्यासाठी सर्वक्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

LEAVE A REPLY

*