नाशिक ढोलच्या गजरात शिवजयंती मिरवणूक

0

नाशिक ,ता. १५  : तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीउत्सवाच्या मिरवणुकीला सायंकाळी पाचच्या सुमारास जुन्या नाशकातील वाकडी बारव येथून प्रारंभ झाला.

डीजेच्या दणदणाटाला फाटा देत नाशिक ढोलच्या गजरात व पारंपरिक वाद्यांसह मिरवणुकीला सुरुवात झाली.

यंदा डीजेला बंदी करण्यात आली असून अनेक मंडळांनी या बंदीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत पारंपरिक वाद्यांचा वापर केला. त्यामुळे ढोल पथकांना सुगीचे दिवस आले.

त्यामुळे नाशिककरांना जुन्या काळातल्या शिवजयंती मिरवणुकांचा आनंद पुन्हा घेता आला.

दरम्यान नवीन नाशिक येथे पवननगर येथूनही दुपारी साडेचारनंतर शिवजयंतीच्या मिरवणुकीला पारंपरिक वाद्यांच्या साह्याने प्रारंभ झाला.

देवळालीकँम्प येथे शिवजयंती मिरवणुकीत महिलांचा लक्षणिय सहभाग दिसून आला.

जिल्ह्यात मनमाडलाही उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. तर पिंपळद येथेही मिरवणूक उत्साहात पार पडली.

ग्रामीण भागात काही ठिकाणी युवकांनी मिरवणुकीत डीजेचा वापर केला.

LEAVE A REPLY

*