नाशिक ढोलचा इफेक्ट, महापालिकेकडून ७० लाखाची वसुली

तीस थकबाकीदारांच्या दारात वाजला ढोल

0

नाशिक | दि.७ प्रतिनिधी
महापालिकडुन मालमत्ता कराची वर्षानुवर्ष थकबाकी ठेवणार्‍यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी शोधण्यात आलेल्या घरासमोर ढोल बजाव प्रकाराचा सकारात्मक परिणाम बघायला मिळत आहे. महापालिकेने दोन दिवसात थकबाकीदारांच्या घर व दुकानासमोर नाशिक ढोल वाजविल्यानंतर मोठी कर वसुली होऊ लागली आहे.

आज दुसर्‍या दिवशी तब्बल ७० लाखाच्यावर वसुली झाली. यामुळे आता शहरात ढोल इफेक्ट महापालिकेच्या तिजोरीत भर टाकत आहे. चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करवसुलीचे उद्दीष्ठ पुर्ण करण्यासाठी अर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात थकबाकी वसुलीला वेग देण्यात आला आहे. याकरिता सुरू केलेल्या मोहीमेत प्रत्येक विभागात ३ याप्रमाणे १८ पथके कार्यरत झाली आहेत.

या पथकांकडुन शहरात मोठ्या धडाबेकाज कारवाई सुरू झाली असुन यात भर म्हणुन थकबाकीदार मिळकतधारकांच्या घरासमोर ढोल वाजविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. थकबाकीदारांच्या घर व दुकानासमोर कर वसुलीसाठी ढोल वाजविण्यास प्रारंभ केल्यानंतर पथकाला पहिल्याच दिवशी वसुलीच्या कारवाईत पथकांनी ६८ लाख ५२ हजाराच्यावर रक्कमेची वसुली होऊन ९ मिळकती जप्त केल्या आहे.

त्यानंतर आज दुसर्‍या दिवशी शहरातील ३० थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजविण्यात आला. या प्रकारामुळे आजुबाजुला गर्दी होत असल्याने नागरिक उत्सुकतेपोटी ढोल कशामुळे वाजत आहे, याची विचारणा करीत आहे. यावेळी महापालिकेच्या कराची वसुलीसाठी ही उपाय योजना केली जात असल्याचा खुलासा पथकाकडुन केली जात आहे. या प्रकारामुळे थकबाकीदार लगेच ढोल वाजवू नका, पैसे भरुन घ्या असे सांगत आहे.

यातून आज सहा विभागात थकबाकीदाराकडुन ७० लाख १८ हजार ९०६ रुपयांची वसुली करण्यात आली. यात एका माजी महसुल अधिकार्‍यांनी ११ लाख २० हजार रुपयांचा धनादेश पथकाला दिला. तसेच आजच्या कारवाईत ७ मालमत्ता जप्त करण्यात आल्या. प्रभारी आयुक्त तथा अतिरीक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त रोहीदास दोरकुळकर यांच्या अधिपत्याखाली ही मोहीम शहरात राबविली जात आहे.

आता ढोलचा खर्च थकबाकीदारांकडुन घेणार?
अतिक्रमण विभागाकडुन अतिक्रमण काढल्यानंतर अतिक्रमण काढण्यासांठी येणारा खर्च संबंधीत मिळकतधारकांकडुन वसुल केला जातो. त्याचप्रमाणे आता थकबाकीदारांकडुन त्यांच्या घर व दुकानासमोर वाजविला जाणार्‍या ढोलचा वेळेनुसार खर्च वसुल करण्याच्या हंालचाली महापालिका प्रशासनाकडुन सुरू आहे. त्यामुळे आता थकबाकीत ढोलचा खर्चाचा समावेश झाला तर आश्‍चर्य वाटायला नको.

LEAVE A REPLY

*