nyna gavit
नयना गावित

नाशिक : नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आज निवडणूक पार पडली. शिवसेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवत कॉंग्रेसच्या पाठींब्याने तब्बल १७ वर्षानंतर शिवसेनेचा जिल्हापरिषद अध्यक्ष म्हणून शीतल उदय सांगळे विजयी झाल्या. शीतल सांगळे यांना ३७ मते पडली. त्यांनी राष्ट्रवादीच्या मंदाकिनी बनकर दोन मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपदी कॉंग्रेसच्या नयना गावित 37 मते मिळवून विजयी झाल्या.

काँग्रेसने शिवसेनेला पाठींबा दिला तर भाजपनेही तिकडे राष्ट्रवादीला पाठींबा दिला होता. त्यामुळे मतांची जुळवाजुळव जमत नव्हती. शेवटी कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) पक्षाच्या दोन सदस्यांना शिवसेनेने सभापती पद देऊ केले त्यामुळे मार्क्सवादी गटाचा पाठींबा मिळवण्यात शिवसेनेला यश आले. तर मार्क्सवादी सदस्याने मतदान केले नाही.

पक्षीय बलाबल पाहता कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच सुरुवातीपासून पडलेला होता. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे २५, कॉंग्रेस ८ , माकप ३ आणि अपक्ष १ अशी ३७ मतांची जुळवाजुळव करत शिवसेना उमेदवाराचा विजय झाला.

LEAVE A REPLY

*