नाशिक जिल्ह्यात स्वाईनफ्लूचा प्रभाव वाढला ; जिल्हा रूग्णालयात 9 रूग्ण 1 गंभीर

0

नाशिक : जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या स्वाईन फ्लूकक्षामध्ये आज आणखी तीघांची भर पडली असून या कक्षातील रूग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे. यामध्ये एक रूग्ण गंभीर असून त्यावर अतिदक्षता विभागात उपचार सरु आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मागील गरुवारी संगमनेर येथील स्वाईन फ्लू रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर तसेच परिचारीकांना मारहाणीचा संतापजनक प्रकार घडला होता. यानंतर रूग्णालय प्रशासनाने या कक्षाची सुरक्षितता अधिक वाढवली आहे. आज या कक्षात तीन स्वाईन फ्लू सदृष्य आजाराचे रूग्ण दाखल झाले आहेत. या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आले असून त्यांचेही रक्ताचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे रूग्णालय प्रशासनाने सांगीतले.

यामधील तीघे हे नाशिक शहरातील आहेत यमाध्ये पंचवटी, इंदिरानगर व अंबड, चुंचाळे या परिसरातील रूग्णांचा समाावेश आहे. तर 6 रूग्ण हे जिल्ह्यातील सटाणा, कळवण, मालेगाव, ईगतपूरी, नांदगाव, निफाड येथील आहेत. तर आठ दिवसांपूर्वी दाखल झालेल्या दोघांचे अहवाल नकारात्मक आल्याने त्यांच्यावर औषधोपचार करून सोडून देण्यात आले आहे.

दरम्यान, या पुर्वी दाखल झालेल्या रूग्णांचे तपासणी अहवाल अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नसल्याने त्यांच्यावर या विशेष कक्षामध्येच उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये स्वाईन फ्ल्युसाठी दिल्या जाणार्‍या टॉमीफ्लूया गोळ्यांचा साठाही पुरेशाप्रमाणात असून जिल्हयातील उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही पुरवठा करण्यात आला असल्याने नागरीकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*