नाशिक जिल्ह्यात वाढतोय शेतकरी आत्महत्यांचा आलेख ; अडीच महिन्यात 12 शेतकर्‍यांनी संपवली जीवनयात्रा

0

नाशिक : जिल्ह्यात जानेवारी ते आजअखेर 12 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. 2016 ते फेब्रुवारी 2017 या 14 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 95 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.

शेतकरी आत्महत्येप्रश्नी सरकारने जिल्हा प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र याबाबत जिल्हा प्रशासन फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते.

त्यामुळेच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढत असल्याचे दिसून येते. मंगळवारी सिन्नर तालुक्यातील दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येते.

गेल्यावर्षी आवर्षणाच्या समस्येमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आपले जीवन संपवले. राज्यभर शेतकरी आत्महत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शासनाने लागलीच शेतकर्‍यांचा समुपदेशनाचा पर्याय त्यावर शोधला.

LEAVE A REPLY

*