Video : नाशिक ‘जिल्ह्याच्या मुलभूत सुविधा केंद्रस्थानी’ ; ‘देशदूत’ला सदिच्छा भेट प्रसंगी जि.प.अध्यक्षा शीतल सांगळे यांचे प्रतिपादन

0

नाशिक : जिल्हा परिषद ही शासन आणि जनता यांच्यातील महत्वाचा दूवा असलेली स्थानिक स्वराज्य संस्था असते. त्यामूळे निधी विनीयोग, योजनांची प्रभावी अंलबजावणी आणि नागरी मुलभूत सुविधा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे जि.प.अध्यक्षा म्हणून केंद्रस्थानी असेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा शीतल सांगळे यांनी ‘देशदूत’ला सदिच्छा भेट प्रसंगी केले.

यावेळी त्यांच्या सोबत जि.प. उपाध्यक्ष नयना गावित यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी प्रविण जाधव, प्रशांत बच्छाव, उदय सांगळे, स्वीय सहाय्यक जे.पी.खैरनार आदी उपस्थित होते. ‘देशदूत’चे कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे यांनी जि.प.अध्यक्षा सांगळे, उपाध्यक्षा गावित यांचे स्वागत केले.

जि.प. कारभाराच्या वाटचालीस सुभेच्छा दिल्या.यावेळी मनोगत व्यक्त करताना अध्यक्षा यांनी जिल्हा परिषदेचे प्रस्तावित कामे कामे, जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळवण्याचे नियोजन, खाते प्रमुखांकडून प्रभावीपणे कामाचा निपटारा करून घेण्याचा मनोदय व्यक्त करताना महिला सबलीकरणासाठी जिल्ह्यात बचतगटांना सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे आर्वजून नमूद केले. त्यांनी प्रामुख्याने जलसंधारण आणि मुलभुत सुविधांवर भर देणार असल्याचे यावेळी सांगीतले.

जि.प.उपाध्यक्षा नयना गावित यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही पदे महिलांना लाभलेली आहे. त्यामूळे जिल्हाचा विकासाचा विचार प्रामुख्याने केला जाईल. महिला, आदिवासी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर अधिक भर आपण देणार आहे, त्याचबरोबर जि.प.च्या या बाबींशी संबंधित खात्यांचा अभ्यास आपण करीत आहे. जिल्ह्याच्या बहुतेक समस्यांची माहिती घेतल्याचे गावित यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

*