नाशिक जिल्हा रुग्णालयात बाळास टाकून मातेचे पलायन

रुग्णालय प्रशासन - पोलीस कर्मचार्‍यांत तू तू-मैं मैं

0

नाशिक : जिल्हा रुग्णालयात सिझेरीयन होऊन बाळंत झालेल्या व बाळ घेऊन जाण्यासाठी अकांतांडव करणार्‍या अविवाहित मोतेने अखेर आजारी असणार्‍या बाळाास टाकून पळ काढल्याची घटना काल घडली. यानंतर जिल्हा रूग्णालया प्रशासन व येथील पोलीस चौकीतील पोलीस कर्मचार्‍यांत तू तू मै मै झाल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे.

प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये शनिवारी (ता.4) रात्री नाशिकरोड परिसातील 20 वर्षीय अविवाहित तरुणी बाळंतपणासाठी दाखल झाली होती. रात्री अकराच्या सुमारास तिच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली आणि मातेसह बालकाचा जीव डॉक्टरांनी वाचविला. मात्र बालकांची प्रकृती अत्यवस्थ होती. याबाबत जिल्हा रुग्णालयातील संबंधित कर्मचार्‍यांनी रूग्णालय परिसरातील पोलीस चौकीमध्ये माहिती दिली होती. त्यानुसार नोंदही करण्यात आली. याचवेळी सदरची तरुणीही अविवाहित असून तिच्यासमवेत कोणीही नातेवाईक नाहीत अशीही माहिती दिली होती. परंतु त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांने उलट जिल्हा रुग्णालयीन महिला परिचारिकांना यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला.

दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून अविवाहित तरुणी बाळा घेऊन घरी जाण्यासाठी विनवण्या करीत होती. यासाठी तिने महिला कक्षातही गोंधळ घातला. तीला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांच्याकडे हजर करण्यात आले.. त्यावेळी त्यांनी बाळाची तब्बेत अजून चांगली नाही. त्यामुळे आणखी काही दिवस थांबावे लागेल असे सांगितले. मात्र त्यानंतर अवघ्या काही वेळातच त्या मातेने सरळ रुग्णालयाबाहेर रस्ता धरला आणि सीबीएसच्या दिशेने पळत सुटली. तिच्या मागे महिला परिचारिका व सुरक्षा रक्षकही धावले पळाले परंतु ती कोणाच्याही हाती लागली नाही. हे पाहत असूनही पोलीस मात्र ढिम्मपणे पाहात बसले.

यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाने पोलीस चौकीतील पोलीस कर्मचार्‍यांना माहिती दिली असता, त्यांनी उलट प्रशासनालाच खडे बोल सुनावले. त्यामुळे डॉ. होले यांनी सदरची बाब पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या कानावर टाकल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचार्‍यास तातडीने पोलीस उपायुक्तालयामध्ये पाचारण करण्यात आले.

पाच दिवसांपूर्वीच जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिकांनी पोलीस चौकीतील संबंधित पोलीस कर्मचार्‍यास सदरच्या तरुणीची माहिती दिली होती. त्यानुसार नोंद झाली परंतु संबंधित पोलीस ठाण्याकडून त्यासंदर्भात पाच दिवसात कोणतीही दखल घेण्यात आली नाही. उलट रुग्णालयाच्या चौकीतील पोलीस जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनालाच सुनावत होते. परंतु आज थेट उपायुक्तांच्या कानी तक्रार केल्याने संबंधित पोलीस कर्मचार्‍याला सायंकाळी विचारणा करण्यासाठी बोलावणे करण्यात आले होते. दरम्यान आज पोलीसांनी तरूणीच्या घरी जाऊन तीची चौकशी केल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*