नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा बँकेत अडकले सव्वाशे कोटी ; तक्रार करणार

0

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांचे, शिक्षक वेतन आणि योजना कामांसाठी ठेकेदारांच्या मोबदल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या खात्यात अडकलेले सुमारे 125 कोटी रुपये काढण्यासाठी जिल्हा परिषद आता जिल्हा बँकेविरोधात पोलिसांत तक्रार करण्याच्या तयारीला लागली आहे. महावितरणपाठोपाठ जिल्हा परिषदेनेही जिल्हा बँकेविरोधात तक्रार करण्याचा पवित्रा घेतल्याने जिल्हा बँकेच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

महावितरण कंपनीच्या मालेगाव आणि नाशिक शहर परिमंडळात वीजबिलापोटी ग्राहकांनी जिल्हा बँकेत भरलेले 33 कोटी रुपये जिल्हा बँकेने महावितरणच्या खात्यात वळते केले नाहीत. उलट ही रक्कमसुद्धा परस्पर वापरल्याने जिल्हा बँकेविरोधात महावितरणने गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेलाही जिल्हा बँकेविरोधात कारवाई करण्यासाठी पावले उचण्याची तयारी करावी लागत आहे.

कारण जिल्हा बँकेत जिल्हा परिषदेच्या विविध लेखाशीर्षअंतर्गत आणि मोबदला देण्यापोटी सुमारे 125 कोटी रुपये परस्पर बँकेने वापरले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेविरोधात कारवाई म्हणून पोलिसांत तक्रार नोंदवण्याच्या जिल्हा बँकेने हालचाली सुरू केल्या आहेत.
जिल्हा बँकेत जिल्हा परिषदेचे चालू खाते असल्यामुळे कोषागारातून जिल्हा बँकेच्या शाखेत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार विविध लेखाशीर्षअंतर्गत होतात. त्याचबरोबर शिक्षकांचे वेतन, योजना कामांच्या पूर्ततेपोटी ठेकेदारांना कामाचा मोबदला देण्यासाठी जिल्हा बँकेचे धनादेश जिल्हा परिषद देते.

शिक्षकांना गत चार-पाच महिन्यांपासून जिल्हा बँकेतून पैसे मिळालेले नाहीत. तर शालेय पोषण आहाराचे पैसेही जिल्हा बँकेने परस्पर वापरले आहेत. त्याचबरोबर ठेकेदारांचे पेमेंट करण्यातही जिल्हा बँक कुचराई करीत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक यांची बैठक घेऊन जि.प.सीईओंनी एक महिन्यापूर्वी व्यवहार सुरळीत करण्याचे सुचवले होते.

मात्र, तरीही जिल्हा बँकेचे व्यवहार सुरळीत झालेले नव्हते. उलट जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार योजनेचे जिल्हा बँकेत वर्ग झालेले 22 कोटी रुपये पुन्हा जिल्हा बँकेने परस्पर वापरून मोकळे झाले. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षकांचे वेतनही रखडवले. तसेच माध्यमिक शिक्षकांचेही सुमारे 52 कोटी रुपये अडकून पडलेले आहेत. जिल्हा परिषदेने जलयुक्त शिवार, इतर जलसंधारण कामांच्या पुर्ततापोटी ठेकेदारांना जिल्हा बँकेचे धनादेश एनडीसीसीमध्ये बाऊन्स झाले. त्यामूळे जिल्हा बँकेबरोबर जिल्हा परिषदेत बदनाम होण्यास समोरे जात होती.
जिल्हा बँकेतमधून शिक्षकांचे वेतनखाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यासाठी जिल्हा परिषदेने मुभा दिली. त्यामूळे येऊन पुढे शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जमा होणार आहे. मात्र अगोदरची रकम कधी मिळणार यांचे काही उत्तर जिल्हा परिषदेकडे नाही. त्यामूळे महावितरण कंपनीप्रमाणे जिल्हा परिषदेचा लेखा विभागही जिल्हा बँकेच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्याच्या तयारीत आहे. त्यामूळे जिल्हा बँकेची अडचण वाढणार असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

*