नाशिक जिल्हयात 134 स्वाईन फ्लूचे संशयित ; आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू ; 108 रूग्णांवर उपचार

0

नाशिक : नाशिक जिल्हयात आतापर्यंत 134 स्वाईन फलूचे संशयित रूग्ण आढळले असून, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिका आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे यांनी दिली.

जानेवारी ते मार्च 2017 या कालावधीत 108 रूग्णांवर टॅमी फ्लूचे औषध देवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. उपचार केलेल्या रूग्णांमध्ये 52 रूग्ण हे बाहेरचे आहेत.

संशयितांमध्ये महापालिका क्षेत्रातील 18 रूग्ण असून 34 रूग्ण हे जिल्हयाच्या विविध क्षेत्रातील आहेत. तर मृत्यू झालेल्या रूग्णांमध्ये 4 जण हे जिल्हयातील असून तब्बल 11 रूग्ण हे महापालिका क्षेत्रातील आहेत.

दरम्यान स्वाईन फ्लू संशयित रूग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात कक्ष उभारण्यात आला असून, महापालिकेच्या जुन्या नाशिक विभागातही एका रूग्णालयात स्वाईन फलू कक्ष उभारण्यात आला आहे.

स्वाईन फलूचा फैलाव होवू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य अधिकारंयानी दिली. दरम्यान बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लू वाढत आहे. त्यामुळे स्वाईन फलू झाल्याची कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास तत्काळ जवळच्या रूग्णालयात संपर्क साधण्याचे अवाहनही महापालिकेकडून करण्यात आले आहे.

स्वाईन फलूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे अवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे. याशिवाय जनजागृतीही करण्यात येत आहे. स्वाईन फलूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा रूग्णालयात सर्व प्रकारची तयारी करण्यात आली असून, टॉमी फलूच्या गोळया व अन्य औषधांचाही पुरवठा करण्यात आला आहे.

स्वाईन फ्लू झाल्याची कोणतीही लक्षणे आढळल्यास त्याबाबत काळजी घेण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सोशल नेटवर्कींग, वेबसाईट, महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवरही जनजागृती करण्यात येत आहे. जेणेकरून स्वाईन फलूचा फैलाव रोखणे शक्य होईल.

LEAVE A REPLY

*