नाशिक अजिंक्य : जळगाव उपविजयी

0
जळगांव । येथे झालेल्या 17 वर्षे वयोगटात मुलांमध्ये एच. पी. टी. आर. वाय. के कॉलेज तर मुलीमध्ये रंगुबाई जुन्नरे नाशिक विजयी ठरले मुलांमधे सेंट टेरेसा स्कूल जळगाव उपविजेते व मुलीमध्ये एच.आर.पटेल स्कूल शिरपुर उपविजेते ठरले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जैन स्पोर्टस अ‍ॅकडमी प्रायोजित नाशिक विभागीय शालेय 17 वर्षा खालील टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीड़ा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात आले होते. नाशिक विभागीय 17 वर्षाखालील मुले व मुलींच्या स्पर्धेत एकूण 16 संघांचा सहभाग होता. त्यात 80 मुले व मुली यांनी आपले कौशल्य पणाला लावून सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली.

16 ऑक्टोबरला चंद्रपुर येथे राज्य शालेय स्पर्धेसाठी नाशिक विभागाचे विजयी संघ प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच प्रत्येक गटातील तीन मुले व तीन मुली राज्य निवड चाचणीसाठी प्रतिनिधित्व करतील त्यांची सुद्धा निवड चाचणी क्रीडा संकुलावर घेण्यात आली यात् एकूण 40 मुला मुलींनी सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ शिवछत्रपति पुरस्कार प्राप्त व विश्व कॅरम स्पर्धेतील स्वर्णपदक विजेती आयशा शेख यांच्या शुभ हस्ते पार पडले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवछत्रपति पुरस्कार अंजली पाटिल, क्रीडा अधिकारी रेखा पाटील,जैन स्पोर्ट्स अकादमीचे क्रीडा समन्वयक फारुक शेख, नाशिकचे राष्ट्रीय खेळाडू डॉ.मयूरेश कुलकर्णी,व संजय मालसुरे, टेबल टेनिसचे राष्ट्रीय खेळाडू व असोसिएशनचे सचिव विवेक आळवणी, यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रीडा प्रेमींचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

LEAVE A REPLY

*