नाशिकहून मुंबई पुणे विमानप्रवास करा अवघ्या अडीच हजारांत

0

नाशिक : स्वस्त उड्डाण योजनेंतर्गत नाशिकहून मुंबई आणि पुणे विमानप्रवास अवघ्या अडीच हजारांत करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी उडाण योजना असून त्यातील 45 मार्ग जाहीर झाले आहेत. नाशिकहून मुंबई आणि पुण्याचा विमानप्रवास सप्टेंबर महिन्यापासून सुरु होणार असून प्रवाश्यांना घेऊन  ओझर विमानतळावरून विमान निर्गमन करणार आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या ५ शहरांचा यात समावेश आहे या मार्गावर अवघ्या अडीच हजार रुपयात प्रवास करता येणार आहे. नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी देशभरातील मार्गांची आज घोषणा केली. ट्विटरवरहि त्यांनी शहरांची यादी आणि विमानसेवा सुरु होण्याची तारिख अपडेट केली आहे.

‘उडाण’ या योजनेनुसार एक तासाचा हवाईप्रवास अवघ्या अडीच हजार रुपयात करता येईल असेही सांगण्यात आले आहे.

असे आहेत महाराष्ट्रातील हवाई मार्ग

  • नांदेड- मुंबई –  (जून- 2017)
  • नांदेड – हैदराबाद- (जून- 2017)
  • नाशिक (ओझर) – मुंबई (सप्टेंबर- 2017)
  • नाशिक (ओझर) – पुणे (सप्टेंबर- 2017)
  • कोल्हापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017)
  • जळगाव -मुंबई (सप्टेंबर- 2017)
  • सोलापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017)

स्वस्त विमान उड्डाण योजनेच्या अटी आणि शर्ती

या योजनेनुसार या मार्गावरील विमानातील एकूण सीट्सच्या 50 टक्के सीट या अडीच हजार रुपयांच्या असतील. त्याव्यतिरिक्त सीट्ससाठी नियमित मूल्य मोजावे लागेल असे सांगण्यात येत आहे. तर उडाण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि गुंतवणूक वाढेल असा विश्वास नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी व्यक्त केला आहे.