‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो’ चा शानदार शुभारंभ

0

नाशिकरोड : उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपुर सुविधा आणि वाजवी मूल्य यांचा अपुर्व संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या ‘देशदूत’च्या ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो’ प्रदर्शनाचा शानदार काल (दि. 24) मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

जेलरोड येथील सेंट फिलोमिना शाळेसमोर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये नामांकित बांधकाम व्यावसायिक, गृह वित्त पुरवठादार संस्था आणि तत्सम स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

बिझनेस बँकेचे चेअरमन वसंतराव नगरकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महावितरणचे मुख्य दिपक कुमटेकर, नाशिकरोड व्यापारी बँकेचे उपाध्यक्ष अशोक चोरडिया, बिझनेस बँकेचे उपाध्यक्ष मनिष घोडके, संचालक नेमिचंद कोचर, कारडा कन्स्ट्रक्शनचे प्रेम कारडा, महावितरणचे उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी विश्वास पाटील, जनसंपर्क अधिकारी विजय दुधभाते यासह देशदूतचे कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे, जाहिरात विभागाचे विभागीय व्यवस्थापक आनंद राईकर, मिलिंद वैद्य, नाशिकरोड कार्यालयप्रमुख पराग पुराणिक मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रदर्शनाचे प्रायोजकत्व कारडा कन्स्ट्रक्शन्स व गिरी असोसिएटस यांनी स्विकारल आहे.

प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत दुपारी 4 ते रात्रौ 9 या वेळेत सर्वांसाठी खुले असून गृहस्वप्नपूर्तीसाठी नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काल पहिल्याच दिवशी नाशिकरोडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल ‘देशदूत’चे कौतुक केले. प्रास्ताविकातून कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे यांनी आतापर्यंत सातपुर, नवीन नाशिक, पिंपळगाव व नाशिकरोड या ठिकाणी अशा एक्स्पोला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे नमूद केले.

नाशिकरोडला हे एक्स्पो दुसर्‍यांदा आयोजित केले असून यंदाही ग्राहकांचे उत्तम सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. सुत्रसंचालन व आभार रवींद्र केडिया यांनी मानले. त्यानंतर मान्यवरांनी सर्व स्टॉलला देऊन पाहणी केली.

मध्यमवर्गीयांना वाजवी दराज गृहप्रकल्प उपलब्ध करून देण्याचा ‘देशदूत’चा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमामुळे बांधकाम व्यवसायात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. ग्राहक व बांधकाम व्यावसायिकांचा सकारात्मक दृष्टिकोन शहराला स्मार्ट सिटीकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरणारा आहे. यासह शहरातील चांगले रस्ते, पोषक हवामान, वाहतुक व्यवस्था या बाबींमुळे बांधकाम व्यवसायास येथे वातावरण आहे. ग्राहकांना गृहस्वप्नपुर्तीचा आनंद देण्यासाठी बिझनेस बँकेतर्फे वित्त पुरवठा करण्यास बँक व्यवस्थापन तत्पर आहे.
-वसंतराव नगरकर, चेअरमन, बिझनेस बँक

कमी खर्चात व एकाच छताखाली घरासाठी बहुविध पर्याय उपलब्ध करणार्‍या नाशिकरोड प्रॉपटी एक्स्पोच्या आयोजनाबाबत देशदूतचा हा उपक्रम स्तुत्य आहे. सर्व नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी या प्रदर्शनात घेतलेला सहभाग या व्यवसायाची स्पष्ट करणारा आहे. या उपक्रमामुळे एक नवा पायंडा घातला गेला असून यापुढे अशा उपक्रमात सातत्य ठेवल्यास ग्राहकांना हक्काचे घर मिळण्यास मदत होणार आहे.
-दिपक कुमटेकर, मुख्य अभियंता, महावितरण

देशदूतने आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र यांच्या ‘पंतप्रधान आवास योजना’च्या माध्यमातून त्यांनी केलेल्या आवाहनानुसार मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न निश्चित पुर्ण होणार आहे. नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकसुद्धा घरासाठी अर्थसाहाय्य करण्यास कटिबद्ध असून ग्राहकांनी सेवेचा लाभ घ्यावा.
-अशोक चोरडिया, उपाध्यक्ष, ना.रोड-देवळाली व्यापारी बँक

LEAVE A REPLY

*