नाशिकमध्ये हागदारीमुक्ती; 4300 शौचालयांचे काम पूर्ण

0

नाशिक । दि. 16 प्रतिनिधी
जिल्ह्यात आता हागणदारीमुक्ती अभियान राबवले जात आहे. ग्रामीण भागात सुमारे साडेसात हजार कुटुंबांना वैयक्तिक वा सार्वजनिक शौचालयांच्या माध्यमातून हागणदारीमुक्ती चळवळीत सामावून घेतले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यात हे अभियान राबवण्यात येत असून यासाठी अनुदान वाटपही करण्यात आले असून अनेक तालुक्यात सुमारे 90 टक्के प्रगती साध्य केली आहे.

केंद्रातील नव्या भाजप सरकारने ग्रामीण व शहरी अशा दोन्ही स्तरांवर देशभर हागणदारीमुक्ती चळवळ पुन्हा नव्या जोमाने हाती घेतली आहे. 2019 पर्यंत देश हागणदारीमुक्त करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे. यात महाराष्ट्र सरकारनेही सहभाग घेतला असून, महाराष्ट्र येत्या 2017 पर्यंतच हागणदारीमुक्तचे टार्गेट राज्य सरकारने ठेवले आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने नाशिक जिल्ह्यात हे अभियान राबविले जात आहे. राज्य सरकारने हागणदारीमुक्तीची मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 नोव्हेंबर रोजी राज्यात हागणदारीमुक्ती मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. सदर निर्णयान्वये जिल्ह्यात हागणदारीमुक्ती मोहीम राबवण्यात येणार आहे.

लोटाबंदीच्या निर्णयामुळे आजारांना पायबंद होणार असून गोरगरीब जनतेला सुखी-आनंदी आयुष्य जगता येईल. शिवाय या आजारांमुळे वैद्यकीय उपचारावर होणार्‍या खर्चालाही आळा बसेल, यात शंका नाही. वेळप्रसंगी पोलीस कारवाई प्रशासनाला लोटाबंदीचे फायदे आणि दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्याबरोबरच योजनेची अंमलबजावणी करण्यास कुचराई करणार्‍यांविरुध्द प्रसंगी पोलीस कारवाई करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

*