नाशिकमध्ये पावसाची दमदार हजेरी; पेरण्यांची लगबग

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी) ता. २७ : मोसमी पाऊस नाशिक जिल्ह्यात सक्रीय झाला असून दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाने नाशिक व परिसरात दमदारपणे हजेरी लावली.

या पावसामुळे मशागत करून तयार केलेल्या शेतांमध्ये आता पेरण्यांची लगबग सुरू होण्याची चिन्हे आहेत.‍

आज नाशिक शहरासह विल्होळी, गोंदे, पाथर्डी, पिंपळगाव खांब, अंबड गांव, चुंचाळे, या ग्रामीण भागासह इंदिरानगर, नवीन नाशिक, मोरवाडी, कामठवाडा, उंटवाडी येथे पावसाची दमदार हजेरी लागली.

 

LEAVE A REPLY

*