नाशिकमध्ये गायी, म्हशी पाळायच्यात; परवाना बंधनकारक

0

नाशिक  । दि. 25 प्रतिनिधी

महानगर पालिका हद्दीत जनावरे पाळण्यासाठी, त्यांची ने आण करण्यासाठी परवाना बंदनकारक करण्यात आला आहे

असा परवाना न घेणार्‍या गोठे धारक तसेच जनावरे पाळणारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकार्‍यांनी दिला आहे.

महानगर पालिका क्षेत्रासाठी महाराष्ट्र नागरी हद्दीत जनावरे पाळणे, त्यांची ने आण करणे (नियंत्रण) अधिनियम 1967 हा कायदा लागू करण्यात आलेला आहे.

या कायद्यानुसार नशिक महापालिका हद्दीत विना परवाना जनावरे पाळणे, त्यांची ने आण करणे हे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाचा परवाना घेणे व तो वेळोवेळी नुतनीकरण करून घेणे बंदनकारक आहे.

या अधिनियमाअंतर्गत कलम 13(1) (ब) अन्वये विना परवाना जनावरे पाळणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी 2 हजार रूपये दंड व 3 वर्षांपर्यत कारवासाची शिक्षा होऊ शकते.

LEAVE A REPLY

*