नाशिकमध्ये ‘आयटी’च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

0

नाशिक : येथील के.के.वाघ महाविदयालयात आयटी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कौशल्य बाग (21, रा.खोडेनगर, ऍपल इट सोसायटी, ए विंग 402) याने आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद झाली आहे. कौशल्यने गळफास घेतल्याचे लक्षात आल्यावर त्याचा भाऊ ऋषिकेश याने तात्काळ त्यास भाभानगर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले.

डॉक्टरांनी तपासणी करुन कौशल्यला मृत घोषित केले. आयटीचे शिक्षण घेत असताना कौशल्यला अल्पावधीच संगणक तज्ज्ञ म्हणून नाशिकमध्ये ओळख होती. गेल्या महिन्यात नाशिक पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित मॅरेथोन 21 के पार पडली. या स्पर्धेचे ड्रोनद्वारे फोटोग्राफी त्याने केली होती.

LEAVE A REPLY

*