नाशिकमधील गुन्हेगारी नियंत्रणात ; सीनियर जर्नालिस्ट फोरमसोबतच्या संवादात पोलीस आयुक्तांचा दावा

0

नाशिक । दि. 30 प्रतिनिधी : नाशिकशहर पोलीस दल आधुनिक होत असून शहरातील क्राईमदेखील दिवसेंदिवस कमी होत असल्याचा दावा पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी केला. पर्यटनासाठी नाशिक येथे येणार्‍या भाविकांसाठी विशेष ‘पोलीस पर्यटन पेट्रोलिंग व्हॅन’देखील लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नाशिकमधील सीनियर जर्नालिस्ट फोरमच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधताना पोलीस आयुक्त बोलत होते. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व शहरातील वृत्तपत्रांचे संपादक उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी विविध श्रेत्रात पोलीस दलाने केलेल्या उल्लेखनीय कामांची व भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. नाशिकमधील झोपडपट्ट्यांमधील किरकोळ व मोठे तंटे मिटवण्यासाठी लवकरच स्वतंत्र समित्यांचे गठन होणार आहे. सध्या आर्थिक गुन्ह्यांचा आलेख सतत वाढत आहे. त्याला नियंत्रित करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेला अधिक सक्षम करण्यात आले असून यासाठी स्वतंत्र 8 अधिकारी व 20 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सायबर गुन्ह्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी व त्यांचा निपटारा करण्यासाठी शासनाकडून ‘सायबर पोलीस ठाणे’ मंजूर करण्यात आले असून तेदेखील लवकरच कार्यरत होणार आहे. नाशिक मोठे तीर्थक्षेत्र म्हणून जगात प्रसिद्ध आहे. येथे येणार्‍या पर्यटकांना कधी कधी लुटण्याचे प्रकारदेखील झाले आहेत. म्हणून मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्ये पर्यटकांच्या मदतीसाठी व त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन निरसन करण्यासाठी लवकरच ‘पोलीस पर्यटन पेट्रोलिंग व्हॅन’ सुरू होणार आहे. ही व्हॅन पोलीस व्हॅनसारखी नसून ती देखणी राहणार आहे. त्यात सक्षम पोलीस अधिकारी, कर्मचारी सतत राहणार आहेत. शहरातील ज्या भागात पर्यटकांची जास्त गर्दी असते अशा ठिकाणी ही व्हॅन फिरणार आहे. यामध्ये असणारे अधिकारी व कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंबईनंतर नाशिकमध्ये अशाप्रकारचा उपक्रम पोलीस दलाच्या वतीने होती घेण्यात येणार आहे. येत्या रामनवमीच्या मुहूर्तावर हा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे पोलीस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. वाहतूक विभागानेदेखील वाहतूक समस्यांबद्दल विविध उपक्रम हाती घेतले असून त्यांचा उत्तम परिणाम दिसत आहे. मध्यंतरी ‘डॉन’ उपक्रम हाती घेण्यात आला होता. याअंतर्गत नागरिकांना वाहतुकीचे धडे देण्यात आले. त्याचप्रमाणे रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करून यामध्ये शाळा, महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांबद्दल जनजागृती करण्यात आली. निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांसारखे उपक्रम घेऊन जनजागृती करण्यात आली. नोटबंदीपूर्वीच नाशिकमध्ये वाहतूक पोलिसांकडे कॅशलेस यंत्रणा कार्यरत करण्यात आली होती. नाशिक नंतर कोल्हापूर, सोलापूर व ठाण्यात अशा प्रकारे दंडवसुली सुरू झाली. शहरातील वाहतुकीचे नियोजन ज्या कारणांनी चुकत आहे त्याचा अभ्यास करण्यात येत आहे. याअंतर्गत शहरातील रस्त्यांवर विनापरमिट धावणार्‍या रिक्षांचा शोध घेण्याचे काम प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने हाती घेण्यात आले असून अशा रिक्षांना त्वरित हटवण्यात येणार आहे. रस्त्यांवर ‘झेब्रा पट्टे’ मारण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. यामुळे कुठे वाहन उभे करायचे याचा नेमका अंदाच वाहनधारकांना येणार आहे. ‘नाशिक रन’सारख्या उपक्रमांमध्ये पोलीस व नागरिकांचा थेट संवाद होण्यास मदत मिळते. ‘नाशिक रन’ शंभर टक्के यशस्वी झाल्याने त्याची सर्वत्र चर्चा झाली. पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांमधील गुणांना वाव मिळावा, त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये निर्माण झालेली नकारात्मक छवी हटवण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षणदेखील देण्यात येत आहे. नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना हेल्मेटचे महत्त्व कळावे यावर विशेष भर देण्यात आला. त्याचा चांगला परिणाम दिसत आहे. सध्या सुमारे 50 टक्के वाहनचालक हेल्मेटचा वापर करीत असून सतत टक्केवारी वाढत असल्याचा दावा पोलीस आयुक्तांनी केला. शहर पोलीस दल पूर्वीपेक्षा अधिक सक्षम होत आहे. शासनाच्या इतर विभागांना ज्या ज्यावेळी पोलीस बळाची गरज लागली त्या त्यावेळी पूर्णपणे ती पुरवण्यात आली. यामध्ये अंबड लिंक रोडवरील शेकडो अतिक्रमित भंगारची दुकाने हटवणे, महात्मा गांधी रोडवरील जिल्हा परिषदेच्या जागेवरील अतिक्रमण हटवणे आदी कामे अत्यंत चोखपणे हाताळण्यात आली. दरम्यान, शहरात वाहनचोरीचे प्रमाणत जास्त आहे. यामध्ये पार्किंगमधून वाहन चोरीस जाण्याचे प्रकार सुमारे 70 टक्के असल्याने या विषयाकडे विशेष लक्ष देण्यात येऊन ज्या ठिकाणी मोफत पार्किंग होत आहे अशा ठिकाणी अल्प दरात पार्किंगची सोय करून दिल्यास त्या पैशांमध्ये अशा ठिकाणी माणूस ठेवल्यास कोण वाहन लावत आहे व कोण घेऊन जात आहे याची माहिती मिळेल. यामुळे वाहनचोरीचे प्रकार कमी होण्यास मदत मिळणार आहे. आगामी काळात पोलीस व नागरिकांमध्ये थेट संवाद व्हावा, दोघांमधील दुरी कमी व्हावी यासाठी उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले. शरणपूररोड येथील पोलीस आयुक्तालयात झालेल्या संवादप्रसंगी गुन्हे व विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे, श्रीकांत धिवरे, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त जयंत कराळे, राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
34 ठिकाणी पार्किंग, 11 ठिकाणी सिग्नल
शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. यासाठी पोलीस दलाच्या वतीने विविध उपयोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील विविध भागात सुमारे 34 पार्किंग पॉईंट मंजूर झाले आहेत. त्यांचा अभ्यास करून व मनपा अधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांना कार्यरत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील काही भागात नव्याने सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. 11 ठिकाणी सिग्नल यंत्रणा लावण्यासाठी शासनाकडून मंजुरीदेखील मिळाली आहे. याबाबत महापौर रंजना भानसी व मनपाचे अधीक्षक अभियंता आदींशी चर्चा झाली आहे. नुकतीच पोलीस आयुक्तांनी एबीबी व जेहान सर्कलची पाहणी केली आहे. लवकरच या ठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणा कार्यरत होणार आहे. वाहनांना अधिक जागा मिळावी म्हणून वाहतूक बेटदेखील कमी करण्यावर विचार होत आहे.
मोठ्या गँग गजाआड
मागील सुमारे दोन वर्षांत शहरातील गुन्हेगारी बर्‍यापैकी कमी झाली आहे. यामध्ये पोलीस दलाला विशेष यश मिळाले आहे. शहरातील अनेक मोठ्या गँगचे म्होरके सध्या गजाआड असल्याचा दावा पोलीस आयुक्तांनी केला. पोलीस दलाने यासाठी विशेष परिश्रम घेऊन कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वेळा कमकुवत कलमांचा फायदा मिळत होता. मात्र वरिष्ठ अधिकार्‍यांनी गँग नष्ट करण्यासाठी विशेष लक्ष दिल्याने त्याचा परिणाम दिसून आला. धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ले करून होणार्‍या खुनांचा सिलसिलादेखील मोडीत काढण्यात बर्‍यापैकी यश मिळाले. मागील काही काळात जे खून झाले त्याला आपसातील भांडणे व नशेत केलेले कृत्य समोर आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आर्थिक गुन्ह्यात ‘मो्नका’ ची तयारी
मोठ्या रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणार्‍यांची गय केली जाणार नाही. मागील काही काळात आर्थिक फवसणुकीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. यामध्ये योग्य कारवाई करून गुन्हेगारांच्या मुस्नया आवळण्यात पोलीस दलाला चांगले यश मिळाले आहे. नुकताच एक मोठा फसवणुकीचा गुन्हा उघड झाला असून याची सखोल माहिती पोलिसांनी गोळा केली आहे. लवकरच यावर ‘मो्नका’ लावण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*