नाशिकच्या सुयशला डेन्मार्क विद्यापीठाकडून पीएचडी

0

नाशिक : नाशिकला सुयश नरेंद्र जोशी यास युरोपातील डेन्मार्क टेक्निकल युनिव्हर्सिटीकडून नुकतीच मॉडेलिंग ऑडीटरी नर्व्ह रीस्पोन्सेस टू इलेक्ट्रिकल स्टीम्यूलेशन प्रबंध सादर केला होता. त्यावर त्यास विशेष प्राविण्यासह पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.

या पदवीसाठी मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ. टोरसन डाऊ, प्रा. जेरेमी मोराझी (कोपरहेगन) केम्ब्रिज विद्यापीठाचे मेंदू तज्ञ डॉ. रोबर्ट कार्वीऑन, अमेरिकेतील रोष्टर विद्यापीठाचे न्युरोसायन्सेस व बायोमेडिकल इंजिनियरिंगच्या प्रा. लॉरेल कर्णी तसेच डीटीव्ही चे प्रमुख प्रा. फिन अगरस्ट हे परीक्षक म्हणून उपस्थित होते.

सुयश सध्या कोपनहेगन येथील डीटीव्हीमध्ये कर्णबधीर रुग्णांसाठी कॉक्वीयार इम्पाट विषयासंबंधी संशोधन करीत असून भारतातील रुग्णांसाठी सदर संशोधनाचा लाभ व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. सुयशच्या यशामुळे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

*