संस्कृत अभ्यासिका नुपूर सावजी

0

माझं शाळेत दहावीपर्यंत संस्कृत होतं. शाळेनंतर मी काही संस्कृत नव्हतं घेतलं पण मला तेव्हापासूनच संस्कृतची गोडी लागली. कारण 11 आणि 12 वी मी सायन्सला होते. पण 12 वी नंतर मात्र संस्कृत घ्यायचं ठरवलं.

त्यासाठी मला घरच्यांना देखील पूर्ण पाठिंबा मिळाला .मग मी एम.ए इन संस्कृत केलं. संस्कृत हा करिअरचा एक हटके पर्याय आहे असं मला वाटत. जे आहे ते पुढे सरधोपटपणे पुढे नेण्यापेक्षा काहीतरी बदल करून केलं तर खूप चांगला करिअर ऑप्शन होऊ शकतो. मला नाटकांची आवड आहे.

त्यामुळे मी नेहमी नाटक आणि संस्कृत हे एकत्र करून काय करता येईल हा विचार करते. मी 11, 12 वीच्या मुलांच पुस्तक मी संस्कृत टू इंग्लिश भाषांतरित केलं आहे.

शिवाय इ- लर्निंगसाठी ज्या ऍनिमेटेड सीडी निघतात,  त्यासाठी संस्कृत भाषेत व्हॉइसओव्हर देण्याचं काम केलं आहे. असा वेगळा विचार करणं गरजेचं आहे कारण त्यामुळेच आपल्याला नवीन काहीतरी शिकता येत आणि नवीन काहीतरी करता येतं. इतर क्षेत्रात काम करताना संस्कृतचा नक्कीच उपयोग होतो.

मुळातच भारतात संस्कृतची परंपरा आहे. आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्यांना संस्कृत विषय असतो. संस्कृतचा अभ्यास खूप मोठा आहे. जितका अभ्यास कराल तितकी भाषा उलगडत जाते. संस्कृत भाषेचा उपयोग करून काय बदल करू शकतो. हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे.

– ऋचा दीक्षित

LEAVE A REPLY

*