पक्षीमित्र किर्ती तांदळे

0

बरेचदा पक्षी जखमी होतात तेव्हा माझे मित्रमैत्रिणी माझ्याकडे त्या पक्ष्यांना घेऊन येतात. अशा वेळी त्या पक्ष्यांकडे लक्ष देण्याचं माझं काम असत.  मला ही सवय आधीपासून होती पण कधी मी शिक्षण घेतलं नाही. फक्त निरीक्षण करायची सवय होती आणि त्यातूनच शिकले. गेल्या 8 वर्षांपासून मी करत आहे.

कधी प्राण्यांची भीती वाटली नाही. घरचे देखील मला नेहमीच मदत करतात. माझ्या बबनच्या कारला एकदा बहिरी ससाणा आदळला होता आणि त्यांनी देखील तो घरी आणला. मी त्याच्या योग्य ते उपचार केले आणि मग सोडून दिल.

बरेचदा असंही झालं आहे की काही जंगली पद्धतीचे पक्षी जे घरात कधीही पळू शकत नाही त्यांच्यावर पण उपचार करायची गरज भासली आहे. असं झालं की मी वनाधिकाऱ्यांनी मदत घेते. प्राणी माणसाला काहीही त्रास देत नाही जोपर्यंत माणूस त्यांना त्रास देत नाही. माणसांनी त्रास दिला की मग स्वतःच्या सुरक्षेसाठी प्राणी हल्ला करतात. प्राणी त्रासदायक नाही.

याचसोबत मी आमचा फॅमिली बिझनेस देखील सांभाळते. पण कधी अशी वेळ आली की माझी मिटिंग आहे आणि अशाच वेळी एखाद्या पक्ष्याला नीट करायची वेळ आली तर प्रथम प्राधान्य म्हणजे तो पक्षी असतो. कारण एखाद्या जीवाचे प्राण वाचवणे यामध्ये खूप समाधान आहे.

LEAVE A REPLY

*