कीर्तनकार रेणू रामदासी

0

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी सहजच शिकायचं म्हणून कीर्तन शिकण्यासाठी सज्जनगडावर गेले. कीर्तन म्हणजे काय हे देखील तेव्हा माहित नव्हतं. पण जशी सुरुवात झाली तसतसा माझा त्यामध्ये खूप रस वाढला.

आमच्या घरात कीर्तन केले जात असे पण घरातील पहिली स्त्री कीर्तनकार मी. वयाच्या 17 व्या वर्षी मी पहिल्यांदा कीर्तन केलं. गेल्या पाच वर्षांपासून सतत मी कीर्तन करत आहे.

कीर्तन करताना पूर्वरंग आणि आख्यान असे असते. कीर्तन म्हणजे आपण कसं जगावं आणि इतरांना जगायला कसं शिकवावं.

कीर्तन करताना मला कधी भीती वाटली नाही की माझ्यासमोर किती लोक बसली आहेत कारण कीर्तन करताना आपण कोणासाठी करत आहोत किंवा एखादा अभंग कोणासाठी म्हणत आहोत हे जास्त महत्त्वाचं असत. त्यांनाच जस मी कीर्तन ऐकवते या अर्विभावातच कीर्तन म्हणते.

मला भविष्यात देखील कीर्तन करायला आवडेल. समाजप्रबोधन हा कीर्तनाचा मूळ उद्देश. हल्ली आपण अनेक ठिकाणी वाढती गुहेगारी बघतो, वाईट प्रवृत्ती बघतो पण हे कशामुळे झालं तर आपण आपले मूळ संस्कार आणि संस्कृती विसरत जात आहोत म्हणून.

कीर्तन म्हणजे काही ठिकाणी मी खूप वाईट पद्धतीचे ऐकले ज्यामध्ये स्त्रियांची अवहेलना केली जाते पण ज्यामध्ये स्त्रियांची अवहेलना केली जाते त्याला कीर्तन म्हणता येणारच नाही.

 

LEAVE A REPLY

*