नाशिकच्या उद्योग वाढीसाठी उद्योगमंत्र्यांना साकडे; निमा शिष्टमंडळाची विविध प्रश्नांवर चर्चा

0

सातपूर । नाशिक औद्योगिक क्षेत्राच्या विविध प्रश्नांसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत निमा शिष्टमंडळाची बैठक खा.गोडसे यांच्या उपस्थितीत काल उद्योग मंत्र्यांच्या दालनात पार पडली.

उद्योग मंत्र्यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत विविध औद्योगिक प्रश्नांवर चर्चा झाली. बैठकीस निमातर्फे अध्यक्ष मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष मनिष कोठारी, निमा सचिव ज्ञानेश्वर गोपाळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुरवाडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नाशिकच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, नितीन पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

मेक इन नाशिक उपक्रमात मा. केंद्रिय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते यांनी जाहीर केल्याप्रमाणे निमाने दि. 30 व 31 ऑक्टोंबर 2017 अशी दोनदिवसीय नाशिकमध्ये ‘व्हेंडर डेव्हलमेंट मिट’ चे आयोजन केले होते.

या ‘व्हेंडर डेव्हलपमेंट मिट’च्या माध्यमातून मा. केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी दिलेल्या वचनाची पूर्ती झाली. मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून मेक इन नाशिकच्या विकास कामाला गती मिळालेली नसल्याची कंत उद्योजकांनी मांडली. उद्योग मंत्र्यांनी यात लक्ष घालून या वाटचालीत सहकार्य करण्याचे आवाहन निमा शिष्टमंडळाद्वारे करण्यात आले.

बैठकीत आयटीपार्कची इमारत भाडेतत्वावर देणे व परिसरातील भाडेपट्टीचा सर्व्ह करुन भाडे कमी करण्यावर विचार विनिमय करण्यात आला. दिंडोरी आद्योगिक क्षेत्रातील जागेचे दर कमी करणे व अधिग्रहण जलद करणे, सिन्नर येथे अतिरिक्त जागा मिळणे, मेक इन नाशिक उपक्रमाच्या माध्यमातून येवू इच्छिणार्‍या उद्योगांसाठी जागा एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करुन देणेेआदींसह विविध बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी उद्योगमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनानंतर संबंधित अधिकार्‍यांसमवेत नाशिकमध्ये बैठकीचे आयोजित करणार असल्याचे स्पष्ट केले.तसे संबंधितांना आदेशितही केले.

वरील बाबी व आयटी पार्कच्या बाबतीत एमआयडीसीची विशेष बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*