नाशिकचे निलेश राणे राष्ट्रीय व राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित

0

नाशिक : अविष्कार फाउंडेशन यांच्यातर्फे संस्कृती भवन, पणजी (गोवा) येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातून नाशिकचे युवा क्रीडा मार्गदर्शक निलेश राणे यांना राष्ट्रीयक्रीडारत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हा विशेष पुरस्कार त्यांना ज्येष्ठरंगकर्मी पद्मश्री विजेते मा.प्रसाद सावकार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी गोवा मराठी परिषदेचे अध्यक्ष प्रा.अनिल सामंत व अविष्कारचे संस्थापक संजय पवार हे मान्यवर उपस्थित होते.

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बघून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. राणे यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य परिवारातील होतकरू खेळाडूंसाठी उचलेले पाऊल त्यासाठी घेत असलेले परिश्रम व त्यांना वेळोवेळी अचूक मार्गदर्शन करून खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत सहभाग नोंदवणे.

अशी उत्कृष्ट कामगिरी करत असल्याने यावर्षी त्यांना राष्ट्रीय क्रीडारत्न गौरव व स्वातंत्र्यवीर सावरकर आदर्श क्रीडागुरु राज्य हे दोन्ही पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या दोन्ही पुरस्कार मिळाल्याबद्दल मधुकर राणे, सुधाकर राणे, विजय देसले, विश्वास देवरे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

*