नाशिकचा सत्यजीत बच्छाव बीसीसीआयचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज

0

नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा रणजी खेळाडू सत्यजीत बच्छाव याला सी. के. नायडू आखिल भारतीय क्रिकेट  स्पर्धेसाठी राष्ट्रीयस्तरावर सर्वाधिक विकेट घेतल्याबद्दल बीसीसीआयचा उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार जाहीर झाला.

हा पुरस्कार बीसीसीआयच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये दिनांक ८ मार्च २०१७ रोजी बेंगलुरू येथे भारतीय संघातील दिग्गज आजी-माजी खेळाडूंच्या उपस्थितीत प्रधान करण्यात येणार आहे

त्याच्या या यशाबद्दल माहात्मा गांधी विद्यामंदीर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत दादासाहेब हिरे, संस्थेचे समन्वय आमदार डॉ. अपूर्व हिरे, समन्वयक अद्वय हिरे,  महाविद्यालयाचे प्राचार्य व डॉ. बापूसाहेब जगदाळे, उपप्राचार्या डॉ. मृणाल भारद्वाज, क्रिडा संचालक डॉ. संतोष पवार, प्रा. रोशनी गुजराथी,  प्रा. किशोर राजगुरू, श्री राम कुमावत विभाग प्रमुख, प्राध्यापक, आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

*