नाशकात सेना प्रबळ विरोधक : चौधरी

नवनिर्वाचीत नगरसेवकांचा सत्कार

0

नाशिक | दि. ५ प्रतिनिधी- मुंबई महानगरपालिकेत महापौर व इतर सभापतीपदांसाठी निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेत भाजपने शिवसेनेला सत्तेचा मार्ग मोकळा करून दिला आहे. यासह विरोधी पक्षातही बसणार नसल्याचे सांगत भाजप तटस्थ राहिले आहे. मात्र मुंबईत काहीही झाले असले तरी नाशकात मात्र शिवसेना प्रबळ विरोधी पक्ष म्हणूनच उभा ठाकरणार असल्याचे संपर्क प्रमुख अजय चौधरी यांनी स्पष्ट केले.

शालिमार चौकातील कार्यालयात शिवसेनेच्या नवनिर्वाचीत नगरसेवकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार अजय चौधरी व उपस्थित पदाधिकार्‍यांच्या हस्ते या ३५ नगरसेवकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शहरप्रमुख अजय बोरस्ते, शिवाजी सहाणे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संपर्क प्रमुख अजय चौधरी म्हणाले, नाशिक महानगर पालिकेत किमान आपण ५० आकडा गाठू असा अंदाज होता. परंतु यामध्ये आपण कमी पडलो आहोत. परंतु हा आकडा मागच्यापेक्षा १६ ने जास्त आहे. यामुळे आता सर्वानी एकजूट साधून नागरीकांच्या प्रश्‍नांवर प्रखरपणे सभागृहात बाजू मांडण्याची व प्रश्‍न सोडविण्याची जोरदार तयारी करण्याचे आदेश त्यांनी दिले.

नाशिक महापालिकेत आपले लक्ष १०० प्लस होते. किमान आपण ५० आकडा गाठू असा अंदाज होता. परंतु ५२ ठिकाणी आपण दुसर्‍या स्थानी आहोत. यामुळे आपल्याच लोकांनी गद्दारी केल्याचे स्पष्ट होत आहे. आपण प्रभागनिहाय अहवाल मागवला असून यामध्ये स्वतः जातीने लक्ष घालणार आहोत.

तर पक्षाशी प्रातरणा करणारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे आपले काय चुकले याची प्रत्येकाने कारणमिमांसा करून झालेल्या चुका सुधारण्याचा पुढील काळात प्रयत्न करण्यास त्यांनी सांगीतले. निवडुण आलेल्या सर्व शिलेदारांनी कोणत्याही अफवा तसेच अमिषांना बळी न पडता एकोपा साधावा, पुढील काळात नागरीकांचे अधिकाधीक प्रश्‍न सोडविण्यासाठी याच एकोप्याने सभागृहातही कार्यरत राहण्याचे आदेश त्यांनी दिले.

गटनेतेपदी शिंदेची एकमताने निवड
महानगर पालिकेत शिवसेना पक्षाचे गटनेता म्हणून विलास शिंदे यंच्या नावाचा ठराव आजच्या बैठकीत शहरप्रमुख अजय बोरस्ते यांनी मांडला. यास डी. जी. सुर्यवंशी यांनी अनुमोदन देत सर्वांनी एकमताने शिंदेची निवड केल्याचे घोषीत करण्यात आले.

LEAVE A REPLY

*