नाशकात भाजपच्या विजयाचा जल्लोष

0

नाशिक : नाशिक महानगरपालिकेवर पहिल्यांदाच बहुमत प्राप्त केलेल्या भारतीय जनता पार्टीचा उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये स्पष्ट बहुमताने विजय झाला. यामुळे शहरातील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. सकाळपासूनच भाजप कार्यालयात मोठ्या स्क्रीनवर निकाल पहिले जात होते. यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी येथे गर्दी केली होती.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचा कौल भाजपच्या बाजूने लागत असतांना मिठाई तोंडात भरवून तोंड गोड करत जल्लोष केला. यावेळी भाजपचे लक्ष्मण सावजी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित नगरसेवकांची आज सकाळपासूनच कार्यालयात गर्दीआहे.

दुपारी संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते भाजपच्या विजयाचा जल्लोष करणार असल्याची माहिती शहर भाजपकडून देण्यात आले आहे. दोन वाजेनंतर याठिकाणी सर्व कार्यकर्ते जमणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

आज सकाळपासून सुरु झालेली पाच राज्यांच्या मतमोजणीदरम्यान सर्व राज्यांत सत्तांतर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये 5 पैकी 3 राज्यात भाजपची मुसंडी घेतली आहेत तर पंजाब आणि गोव्यात काँग्रेसची वापसी झाल्याचे चित्र दिसून येते आहे.

एक्झिट पोलच्या अनुशंघाने सर्व राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत देण्यात आले होते परंतु तीनच राज्यांत भाजपला मतदारांनी कौल दिला आहे. कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टीचे मोठा पराभव झाल्याने मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राजीनामा दिला आहे.

LEAVE A REPLY

*