नाले सफाईबाबत आयुक्त करणार पाहणी

0
जळगाव । दि 13 । प्रतिनिधी-दोन दिवसपुर्वी शहरात झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण झाली. शहरातील काही भागांमध्ये नागरीकांच्या घरात पाणी शिरल्याने नाले सफाई झालीच नसल्याची तक्रार अनेकांनी प्रशासनाकडे केली.
त्यामूळे शहरातील चारही प्रभागामध्ये आयुक्त जीवन सोनवणे हे दि.16 व 17 रोजी पाहणी करणार आहेत.
महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची मोहीम राबविली होती.

परंतु दोन-तीन दिवसांपासून शहरात दमदार पाऊस झाल्याने शहरात पूरसदृष्य परिस्थीती निर्माण झाली होती. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याने संसारपयोगी साहित्य नुकसान झाले.

त्यामूळे योग्य पध्दतीने नाले सफाई झाली नसल्याच्या तक्रारी मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याचअनुषंगाने दि.16 व 17 रोजी आयुक्त स्वतः पाहणी करणार आहेत.

त्यांच्यासोबत उपायुक्त व आरोग्य अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

नाले सफाईबाबत महापौरांचीही तक्रार
शहरात नाले सफाई व्यवस्थीत न झाल्याने पूरसदृष्य परिस्थीती निर्माण झाली असल्याची तक्रार महापौर नितीन लढ्ढा यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसेच नाल्यांची व्यवस्थीत स्वच्छता न करणार्‍या जबाबदार अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करावी अशी सुचना दिल्या आहे.

स्वच्छतेचे ठेके रद्द करा-सुनिल माळी
शहरातल 37 प्रभागांपैकी 22 प्रभागांमध्ये दरमहा 70 लाख रुपये खर्च करुन सफाईचे ठेके दिलेले आहेत. परंतू साफसफाई होत नसल्याने हे सर्व ठेके रद्द करावे, अशी मागणी भाजपा गटनेते सुनिल माळी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*