नाबार्डच्यावतीने भेंड्यात कृषी जलसंवाद

0

भेंडा (वार्ताहर) – नाबार्ड बँकेच्या जिल्हा विकास कार्यालयामार्फत नेवासा तालुक्यातील भेंडा येथे पाणी हेच जीवन अभियानांतर्गत पाणी बचत, जलजागृती व कृषी जलसा कार्यक्रम घेण्यात आला.

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ‘गावातील एक दिवस’ कार्यक्रमात नाबार्ड प्रशिक्षित कृषीजलदूत अशोक गायकवाड व विक्रम देशमुख यांनी गावातील पाण्याचे नियोजन व वापर, नाबार्ड मार्फत 1 लाख गावांतील 1 कोटी लोकांपर्यंत पोहचून त्यांना जलसंवर्धन, जलपुनर्भरण व जल व्यवस्थापनाचा संदेश देणार असल्याची माहिती देऊन नाबार्डचे कार्य समजावून सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करताना पत्रकार सुखदेव फुलारी म्हणाले, नाबार्ड ही कृषी व आर्थिक क्षेत्रातील महत्त्वाची संस्था आहे.अशा संस्थेने जलसंधारण व जलजागृती कार्यात पुढाकार घेतला ही बाब सर्वांसाठीच महत्त्वाची आहे. पाणी प्रश्‍न आज सर्वात ज्वलंत बनलेला आहे. शासन, स्वयंसेवी संस्थां बरोबरच प्रत्येक नागरिकाने जलसंधारण, जलपुनर्भरण, पाण्याची बचत व काटकसरीने वापर याला महत्त्व दिले पाहिजे. गावातील जलस्त्रोतांची माहिती संकलित करून एकूण उपलब्ध पाणी व पिण्यासाठी-शेतीसाठी लागणारे पाणी यांचा वार्षिक ताळेबंद तयार करून त्यानुसार क्रॉप पॅटर्न ठरविला पाहिजे.

यावेळी उपसरपंच भाऊसाहेब फुलारी, बाजार समिती संचालक डॉ. शिवाजी शिंदे, गणेशराव गव्हाणे, जिल्हा सहकारी बँकेचे अधिकारी नानासाहेब नवले, अशोकराव वायकर, रमेश शिरोळे, नामदेव शिंदे, देवेंद्र काळे, संजय राऊत, अशोक काळे, दादा गजरे, बाळकृष्ण वाघडकर, सोमनाथ करंडे, अंबादास गोंडे, रोहिदास आढागळे, बाबासाहेब वाघडकर, एकनाथ साबळे, दत्तात्रय गव्हाणे, रामचंद्र गंगावणे, संगीता शेलार, उज्वला शेलार, रोहिणी चिंधे, मंगल खरात, हौसाबाई खरात, हौसाबाई आढागळे, मार्था खरात, कडूबाई गोर्डे, शशिकला खरात, शनी मोरे, रामेश्‍वर फुलारी, बापूसाहेब फुलारी, कानिफनाथ मोरे आदी उपस्थित होते.

नाबार्डच्या कृषी जलदूतांनी ‘गावातील एक दिवस’ या उपक्रमाअंतर्गत दिवसभर गावफेरी काढून गाव नकाशा तयार करणे, ग्रामपंचायत, सोसायटी सदस्य, बचत गटांच्या महिला, युवा संयसेवक, शेतकरी यांच्याशी जलसंवाद साधला.

LEAVE A REPLY

*