नाना पाटेकर आणि रजनीकांत एकाच चित्रपटात झळकणार!

0
मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
रजनीकांत यांचा आगामी चित्रपट  ‘काला करिकालन’मध्ये नाना पाटेकर महत्वाची भूमिका निभावणार आहे.
नाना पाटेकर चित्रपटात व्हिलनची भूमिका निभावताना दिसतील.
काही आठवड्यांपुर्वीच नाना पाटेकर यांचं कास्टिंग करण्यात आलं आहे. या चित्रपटात नाना एका दुष्ट राजकारण्याची भूमिका साकारताना दिसतील. तर रजनीकांत त्यांचा कट्टर विरोधक असणार आहे. दोघांमधील ही जुगलबंदी पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
नुकतंच रजनीकांत यांनी मुंबईतील दोन आठवड्यांचं शुटिंग शेड्यूल पुर्ण केलं.
‘कबाली’चे दिग्दर्शक पा. रंजीत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर रजनीकांत यांचा जावई धनुष याने चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपटात हुमा कुरेशी,अंजली पाटील आणि पंकज त्रिपाठी यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत. पंकज त्रिपाठी चित्रपटात पोलीस अधिका-याची भूमिका निभावणार आहे.

LEAVE A REPLY

*