नाते जपावे… नाते जगावे!

0

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये कुटुंब पद्धतीला महत्व आहे. कुटुंबाचा भक्कम पाया म्हणजे नाते संबंध. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे ही नाती जपली जायची. लहानपणापासून मुलांच्या मनावर कोरली जायची. एकत्र राहिल्याने, वाढल्याने त्यातील ओलावा टिकून राहायचा. रक्ताची नाती तर भक्कम होतीच पण मानलेली नाती पण बहरायची. कालांतराने नोकरीनिमित्त असो किंवा स्पेसच्या नावाखाली एकत्र कुटुंब पद्धत विखुरली गेली. छोटे कुटुंब सुखी कुटुंबाचा वेगळाच अर्थ काढत चौकोनी कुटुंब पद्धत उदयास आली. सुरवातीला सणासुदीला हि कुटुंबे एकत्र यायची, दोन तीन दिवस सोबत राहायची त्यामुळे थोडाफार ओलावा टिकून राहायचा. पण आता तेही कमी कमी होत जातंय. नाती ही रुक्ष, स्वार्थी, कामापुरती होत चालली आहे.

नाती हि फुलासारखी नाजूक असतात. चांगली फुलवली तर सुगंध पसरतो. अन कोमेजली कि कचरा बनतो. झाडाला जस खतपाणी देऊन फुलवावे लागते तसे नात्यालाही खत पाणी लागतेच. ते खतपाणी असते प्रेमाचे, आपुलकीचे, ओढीचे, सहकार्याचे, आपलेपणाचे. अशी आनेक खते घालून आपल्याला नाती फुलवता येतात. फकत इच्छा हवी. आजकाल हीच आपलेपणाची भावना मात्र रुक्ष होत चालली. नात्यातील उरला एवढा वाढला कि आई बाप व मुले यांच्या नात्यातही विश्वास राहिला नाही. म्हातारपणाच्या चिंतेने ग्रासलंय सर्वांना का आपण एवढे संस्कार नाही देऊ शकलो आपल्याच मुलांना का संपली त्या नात्यातील ओढ. आपण या कआत्यालाही भौतिक सुखाने मढवले. पैशात मोजले अन सोन्यात मढवले. मग कशी येणार नात्याला उभारी.

आज बरेच लोक एकटेपणाने ग्रासलेत. सहसा शहरी भागातील लोकांना हे जास्त जाणवते. नोकरीमुळे गावाकडे फारसा संबंध राहिला नाही मग दूरचीच काय जवळची नाती पण दूर गेली. वर्ष दोन वर्ष्यातून होणार्‍या भेटी त्यात प्रत्येकाला आलेला अहंपणा यामुळे नाती गोत्यात येतात. मग भाऊ भाऊ सुद्धा सख्खे वैरी होतात. अजून वेळ गेलेली नाही. कमजोर या होईना न्यत्याचा धागा अजून बाकी आहे. करू या का मजबूत त्याला. घालू या खतपाणी भावनांचे अन आपल्याच पुढच्या पिढीसाठी करून ठेवू भावनिक शिदोरी तयार.

मो. 9421060873
– माधुरी चौधरी, औरंगाबाद

LEAVE A REPLY

*