नागपूर महापौरपदी नंदा जिचकार; आता लक्ष नाशिककडे

0

मुंबई, ता. १ : भारतीय जनता पार्टीने महापालिका निवडणूकीत नागपूरमध्ये निर्विवाद यश मिळविल्यानंतर आता तेथील कारभाऱ्यांची घोषणा केली आहे.

महापौरपदी तेथील महिला मोर्चाच्या अध्यक्षा नंदा जिचकार, तर उपमहापौरपदी दीपराज पार्डीकर यांची निवड करण्यात आली आहे

स्थायी समिती सभापतीपदी संदीप जाधव, सभागृह नेतेपदी संदीप जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

नागपूर महापालिका निवडणूकीसाठी भाजपाचे प्रभारी अनिल सोले यांनी काही वेळापूर्वी ही घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या नावांवर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.

नागपूर महापालिका भारतात क्रमांक १ ची महापालिका बनविणार असल्याची घोषणा अनिल सोले यांनी यावेळी केली.

दरम्यान नागपूर व पुणे येथील महापौरपदाच्या घोषणेनंतर सर्वांचे लक्ष नाशिककडे लागले असून लवकरच नाशिकच्या महापौरपदाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

*