नाओमी ओसाका यूएस ओपनची विजेता

0
न्यूयॉर्क । जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विल्यम्सचा पराभव करुन यूएस ओपनमध्ये महिला एकेरीच्या जेतेपदावर नाव कोरलं. नाओमीने कारकीर्दीतील पहिलं ग—ँड स्लॅम टायटल पटकावलं.

नाओमीने 6-2, 6-4 अशा सेटसमध्ये सेरेनाला हरवलं. ग—ँड स्लॅम एकेरीचं विजेतेपद मिळवणारी 20 वर्षांची नाओमी ओसाका ही पहिलीच जपानी खेळाडू ठरली आहे. उपांत्य फेरीत नाओमीने अमेरिकेच्याच मार्गारेट कीची झुंज मोडून काढत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सेरेनाच्या कारकीर्दीतली ही अमेरिकन ओपनमधील नववी आणि ग—ँड स्लॅममधली 31 वी फायनल होती. विशेष म्हणजे सेरेनाने बाळंतपणानंतर वर्षभरातच गाठलेली ही केवळ दुसरी ग—ँड स्लॅम फायनल होती. मात्र, नाओमीने सेरेनाच्या विजेतेपदाचं स्वप्न भंग केलं. मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक 24 विजेतीपदांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी सेरेनाला यावेळी साधता आली नाही.सेरेना आणि नाओमी यांच्या वयामध्ये तब्बल 16 वर्षांचं अंतर आहे. सेरेनाने आपल्या कारकीर्दीतलं पहिलं यूएस ओपन जेतेपद पटकावलं, त्यावेळी म्हणजे 1999 साली नाओमी अवघ्या एक वर्षाची होती.

सेरेना पंचांना म्हणाली ‘चोर’
शनिवारी झालेल्या युएस ओपन 2018 च्या अंतिम सामन्यात सेरेना पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. सेरेनाने पंचांना खोटारडे आणि चोर संबोधले. यामुळे सामन्याच्यावेळी तणाव निर्माण झाला होता. सेरेनाने सामन्यानंतर सांगितले, की अंतिम सामन्यात मी बेईमानी केली नाही. माझ्यावर एका गेमचा दंड लावणे हे लैंगिक भेदभावाचे लक्षण आहे. जर पुरूषांच्या सामन्यात पंचांना चोर म्हणण्यात येते तेव्हा ते एकाही सामन्यासाठी दंड ठोठावत नाही. पुरुष खेळाडूंनी अनेकदा पंचांसाठी अपशब्दांचा वापर केल्याचे मी ऐकले असल्याचे ती म्हणाली. मी पुरुष आणि महिलांच्या समानतेसाठी लढा देत आहे, असे सेरेना म्हणाली.

काय घडले होते नेमके ?
अंतिम सामना सुरू असताना चेअर पंचांनी सेरेनाला चेतावनी दिली की त्यांचे कोच त्यांना इशारे करत आहेत. या इशार्‍यांना पंचांनी कोचिंग समजून नियमांचे उल्लंघन असल्याचे सांगितले. पण सेरेनाने पंचांना सांगितले, की ते केवळ तिला पाठिंबा दर्शवत आहेत.

मात्र, त्यानंतर ओसाकाने सेरेनाची सर्व्हिस तोडली. त्यानंतर जसा गेम संपला सेरेनाने रागाच्या भरात रॅकेट मैदानावर फेकली. याला सामन्याचे उल्लंघन मानून पंचांनी तिच्यावर एका पॉईंटचा दंड ठोठावला. यावरुन सेरेना चिडली आणि तिने पंच रामोस यांना माफी मागण्यास सांगून माईकवर घोषणा करण्यास सांगितली की ती कोचिंग घेत नव्हती. नंतर सेरेनाने रामोस यांना चोर संबोधले आणि त्यामुळे तिसर्‍यांदा नियमांचा उल्लंघन करण्याचा ठपका ठेवत एका गेमचा दंड लावण्यात आला. यामुळे ओसाकाची लीड 5-3 झाली.

LEAVE A REPLY

*