नाईट शिफ्ट करताय? वाचा कशी घ्याल काळजी?

0

अनेक उद्योगांमध्ये नाईट शिफ्ट म्हणजे रात्रीच्या वेळी काम करणे अनिवार्य असते. नाईट शिफ्ट करणार्‍या लोकांना दिवसा काम करणार्‍या लोकांच्या तुलनेत अधिक त्रास होतो.

आरोग्याच्या समस्याही त्यांना उद्भवतात. त्यांच्यासाठी आता अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक उपाय शोधला आहे. या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार नाईट शिफ्ट करणार्‍या लोकांनी लाल प्रकाशात काम केले तर त्यांना खूप आराम वाटेल.

जर्नल ऑफ न्यूरोसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार निळ्या आणि पांढर्‍या प्रकाशात ठेवण्यात आलेले हॅमस्टर प्राणी (उंदरासारखा प्राणी) उदास झाले होते तर अंधारात आणि लाल प्रकाशात ठेवण्यात आलेले हॅमस्टर खूश होते. अमेरिकन शास्त्रज्ञांनी डोळ्यांतील प्रकाशा प्रती संवेदनशील असलेल्या पेशींवर विविध रंगांचा प्रभाव कसा पडतो हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या पेशी थेट मेंदूला संकेत देऊन संदेश पाठवतात, त्यामुळे मेंदू रोजच्या जीवनातील विविध बाबींवर प्रतिक्रिया देऊ शकतो. हॅमस्टर प्राण्यावर केलेले हे संशोधन मनुष्यालाही लागू होते, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. रात्री पांढर्‍या आणि निळ्या रंगाच्या प्रकाशात वावरणार्‍या हॅमस्टर्सचा मेंदू कमी सक्रीय होता. त्यांच्यात निराशेची लक्षणे दिसू नयेत होती. पण अंधारात आणि लालप्रकाशात असलेले हॅमस्टर आनंदात होते.

शास्त्रज्ञांचा दावा आहे की हा सिद्धान्त माणसांनाही लागू होतो. रात्रीच्या वेळीकाम करणार्‍या लोकांसाठी लाल प्रकाशाचा वापर केला गेला पाहिजे. रात्री काम करताना संगणक किंवा टीव्हीच्या स्क्रीनवरही शक्यतो निळा प्रकाश असता कामा नये.

LEAVE A REPLY

*