नांदगाव पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा ; उद्या होणार उमेदवारांची घोषणा

0

नांदगांव : जिल्हा परिषद निवडणुकीत नांदगांव पंचायत समितीवर शिवसेनेला बहुमत प्राप्त झाले आहे. पंचायत समितीच्या सर्व साधरण महीलासाठी हे सभापती पद असल्यामुळे उद्या (दि १४) रोजी सभापती व उपसभापतीची निवड होणार आहे.

याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापू कवडे व जिल्हाअध्यक्ष सुहास कांदे यांच्याकडे असल्यामुळे सभापतीपदावर कोण विराजमान होणार हे मात्र वरिष्ठच ठरवणार आहेत. त्यामुळे राजकीय गोटात चर्चा सुरु आहे.

सभापती पदासाठी सुमनताई विष्णु निकम, विद्यादेवी पाटील यांच्या नावांची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

*