नांदगाव तालुक्यात बिबट्या जेरबंद

0

मनमाड (प्रतिनिधी ) _ नांदगांव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथे एका बैलाला ठार केल्या नंतर पोखरी गावाजवळ  कांद्याच्या एका शेतात लपून बसलेल्या बिबट्याला तब्बल 12 तासा नंतर पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.

ज्या शेतात बिबट्या लपून बसला होता त्या ठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचल्या नंतर बिबट्याच्या जवळ जाऊन त्याला बंदुकीने बेशुद्धीचे इंजेक्शन दिले.

त्या नंतर त्याला पकडून पिंजऱ्यात टाकले.

सकाळी या बिबट्याने जळगाव बुद्रुक व पोखरी परिसरात धुमाकूळ घालून एका बैलाला ठार केले होते. त्यामुळे ग्रामस्थानमध्ये भीतीचे वातावरण पसरून बिबट्याला पकडण्याची मागणी केली जात होती. अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपले जीव धोक्यात घालून बिबट्याला जेरबंद केल्याचे पाहून ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

LEAVE A REPLY

*