Type to search

नव्या वर्षातील नव्या घडामोडी

ब्लॉग

नव्या वर्षातील नव्या घडामोडी

Share
नव्या वर्षात आपल्या देशात नव्या सरकारचा फैसला होणार आहे. नव्या वर्षात राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, क्रीडा क्षेत्रात असंख्य घडामोडी घडणार असून त्यावर सर्वांचेच लक्ष राहणार आहे.

प्रयागराज कुंभमेळा (15 जानेवारी ते 8 मार्च) 12 वर्षांतून एकदा होणारा कुंभमेळा जगातील सर्वात मोठा मानला जातो. देशाबरोबर जगभरातील पर्यटकही कुंभमेळ्यात मोेठ्या संख्येने सहभागी होतात. यावर्षी 15 जानेवारीपासून 8 मार्चपर्यंत हा कुंभमेळा प्रयागराज (अलाहाबाद) येथे होणार आहे. कुंभमेळ्याची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.

एरो इंडिया 2019 (20 ते 24 फेब्रुवारी)
बंगळुरू येथे आशिया खंडातील सर्वात मोठे लष्करी हवाई प्रदर्शन होणार आहे. या कार्यक्रमात एरोस्पेस आणि डिफेन्स कंपन्यांचे प्रदर्शन होईल. त्याचबरोबर नागरिकांसाठी शानदार एरो शोदेखील होणार आहे. चित्तथरारक कवायती आणि हवाई दलाचे सामर्थ्य यानिमित्ताने नागरिकांना आणि जगाला पाहवयास मिळणार आहेत.

लोकसभा निवडणूक 2019 (एप्रिल-मे)
या वर्षातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे लोकसभेच्या निवडणुका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिष्ठा पणाला लावणार्‍या निवडणुकीचे पडघम गेल्या वर्षभरापासून वाजत आहेत. एप्रिल-मेदरम्यान कसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार बहुमताने स्थापन झाले होते. यावेळी आता भाजपला तोंड देण्यासाठी काँग्रेससह विरोधकांची महाआघाडी होत आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे.

सात राज्यांत विधानसभा
लोकसभा निवडणुकांबरोबरच सात राज्यांत निवडणुका होत आहेत. आंध्र प्रदेश, हरियाना, महाराष्ट्र, आसाम, ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या वेळापत्रकाबाबत तर्कवितर्क बांधले जात आहेत. एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत केंद्र सरकार प्रयत्नशील असताना या प्रयत्नांना कितपत यश मिळते, हे आगामी काळच सांगेल.

क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (30 मे ते 14 जुलै)
यंदा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये होत आहे. 50 षटकांच्या प्रकारात भारत तिसर्‍यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी 2011 मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणार्‍या महेंद्रसिंह धोनीचे हे शेवटचे विश्वचषक असू शकते. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अनेक पराक्रम केले असले तरी त्याची खरी कसोटी विश्वचषक स्पर्धेतच लागणार आहे.

महिला फुटबॉल विश्वचषक (7 जून ते 7 जुलै)
यावर्षी फ्रान्सच्या 9 शहरांत महिला वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धा खेळली जाणार आहे. उद्घाटनाचा सामना पॅरिसमध्ये तर अंतिम सामना ल्योन येथे खेळला जाणार आहे. गेल्यावर्षी रशियात खेळल्या गेलेल्या पुरुषांच्या जागतिक फुटबॉल स्पर्धेने जगावर गारूड घातले होते.

दोन सूर्यग्रहणे (जुलै आणि डिसेंबर)
वर्षातील पहिले पूर्ण सूर्यग्रहण 2 जुलै रोजी होणार आहे. ते चिली, अर्जेंटिना, दक्षिण प्रशांत महासागराच्या अनेक भागात दिसणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये होणारे दुसरे सूर्यग्रहण आखातात आणि दक्षिण आशियातील काही भागात दिसणार आहे.

चंद्रावर पाऊल टाकण्यास पाच दशके पूर्ण
2019 मध्ये चंद्रावर व्यक्तीने पहिले पाऊल टाकून पाच दशके पूर्ण होत आहेत. 20 जुलै 1969 रोजी अपोलो 11 नातून जाणारे नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल टाकणारे पहिले व्यक्ती ठरले. या ऐतिहासिक क्षणाला यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत.

संयुक्त राष्ट्र संघ : मूळ भाषेचे वर्ष
संयुक्त राष्ट्र संघाने 2019 हे वर्ष इअर ऑफ द इंजिनिअस लँग्वेज घोषित केले आहे. यामागचा उद्देश म्हणजे जगातील मूळ भाषेविषयी नागरिकांत जागृती घडवून आणणे आणि मूळ भाषा वापरास प्रोत्साहन देणे.

नव्या वर्षाचे आणखी काही आकर्षण
भारताचा जीडीपी पहिल्यांदा ब्रिटनच्या जीडीपीपेक्षा अधिक असणार आहे. 2018-19 मध्ये भारताच्या जीडीपीत 8.2 टक्के दराने वाढ झाली. रिझर्व्ह बँकेच्या हिशेबाने एप्रिल 2019 मध्ये यात 7.4 टक्क्याने वाढ होईल. 200 वर्षे राज्य करणार्‍या ब्रिटनला भारत जीडीपीत मागे टाकेल, असा अंदाज बांधला जात आहे.

2019 मध्ये प्रथमच जगातील तरुणांची संख्या ही वयाची पन्नाशी ओलांडणार्‍या व्यक्तींपेक्षा अधिक असणार आहे. एका अहवालानुसार 2019 मध्ये 1946 पासून 64 मध्ये जन्मलेल्या नागरिकांची संख्या मिलेनियल्स म्हणजेच 1981-96 या काळात जन्मलेल्या लोकांपेक्षा निम्मी होईल.

2019 मध्ये जगातील निम्मी लोकसंख्या ऑनलाईन होणार असून त्यातील बहुतांशी नागरिक हे भारतीय असणार हेत. गेल्या काही वर्षांत भारताचा ऑनलाईन क्षेत्रात वाढवलेला सहभाग पाहता ही बाब रोचक मानली जात आहे. कमी दरात डेटा पॅक आणि इंटरनेट वापरणार्‍या युवकांची वाढती संख्या पाहता भारत इंटरनेटच्या जगात आघाडीवर गेला आहे.

नव्या वर्षात चीनचे पहिले मानवरहित सॅटेलाईट चंद्रावर उतरणार आहे. इस्त्राईलकडूनदेखील चांद्र मोहीम राबवली जाणार आहे. स्पॅरो लॅडर नावाचे सॅटेलाईट चंद्रावर उतरणार असून ही मोहीम बिगरसरकारी असणार आहे.
– विनायक सरदेसाई

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

Next Up

error: Content is protected !!