नवीन नाशिकमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने १६ बालकांना घेतला चावा

0

नवीन नाशिक, ता. २ : नवीन नाशिकमधील राजरत्न नगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घालत दीड ते सात वर्षांच्या सोळा बालकांना चावा घेतला.

या सर्वांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

सोमवार (१मे) मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. त्यानंतर संतप्त झालेल्या दीड ते दोन हजाराच्या जमावाने लाठ्या काठ्यांसह कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला.

पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मनपाच्या श्वान पथकाने कुत्र्याला ताब्यात घेतले.

कुत्रा पकडण्याकामी येथील नगरसेविका रत्नमाला राणे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. तर भूषण राणे यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

पिसाळलेले श्वान पकडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

LEAVE A REPLY

*