नवीन आदेशामुळे जिल्हा बँक संभ्रमात

0

कर्जदारांची माहिती पुन्हा मागविली

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा सहकारी बँकेने आठवडेभरापूर्वीच 1 लाखापर्यंत थकीत कर्जदार शेतकर्‍यांची माहिती राज्य सहकारी बँकेला सादर केली होती. ही माहिती पोहचतेना पोहतेच तेच नव्याने राज्य बँकेने 1 ते 4 नमुन्यात वर्ष, पिकनिहाय व अनुउत्पाक कर्जाची माहिती जिल्हा सहकारी बँकेकडून मागवली आहे. यामुळे जिल्हा सहकारी बँक प्रशासन संभ्रमात पडले आहे.

 
उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या योगी सरकारने 1 लाख रुपयांपर्यत अल्पभुधारक शेतकर्‍यांचे कर्ज माफ केल्यानंतर राज्यात भाजप विरोधी सर्वच राजकीय पक्षांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाङ्गीसाठी रान पेटवले होते. कर्जमाङ्गीसाठी काँग्रेस-रा्रवादी विधानसभेत आणि विधान सभेबाहेरही संघर्ष यात्रा काढून सत्ताधारी भाजपा सरकार विरोधातील रोष जनते समोर आणण्याचा प्रयत्न केला होता. तर विरोधकांच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी सत्ताधार्‍यांनी संवाद यात्राही काढली.

 
दरम्यान, राज्य सरकारने राज्य सहकारी बँके मार्ङ्गत राज्यातील सर्व जिल्हा बँकांमार्ङ्गत 1 लाख रुपयांच्या आत कर्ज थकीत असणार्‍या शेतकर्‍यांची माहिती संकलित करण्याच्या सुचना दिल्या. त्यानूसार नगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तालुका उपनिबंधकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील लाखांच्या आतील थकीत कर्जदारांची माहिती संकलित करुन राज्य सहकारी बँकेला सादर केली. ही माहिती सादर केल्यावर राज्य सरकार काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असतांनाच पुन्हा राज्य सहकारी बँककेने जिल्हा बँकेकडून नव्याने माहिती मागवली आहे. यामुळे जिल्हा बँक डोकेदुखी वाढली आहे.

 
राज्य सहकारी बँकेकडून कर्ज थकीत कर्जादाराची 1 ते 4 नमुन्यांत माहिती मागवली असली तरी ही माहिती कोणत्या आर्थिक वर्षातील असावी, याबाबत कोणतेच मार्गदर्शन राज्य सहकारी बँकेने जिल्हा बँकेला केलेले नाही. यामुळे जिल्हा बँकेचा संभ्रम वाढला आहे. मार्गदर्शक सूचना नसल्याने माहीती संकलित करताना जिल्हा बँकेसह सहकारी सोसायटींच्या नाकेनऊ येणार यात शंका नाही.

 

शेतकर्‍यांचे विरोधकांकडे लक्ष
उत्तर प्रदेश सरकारने कर्जमाङ्गी केल्यानंतरही महारा्र सरकार अद्याप कर्जदार शेतकरी सभासदांच्या आकडेवारी गुंतून पडलेले आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून कर्जमाङ्गीसाठी राज्यातील राजकीय पक्ष, शेतकर्‍यांच्या संघटना काय पाऊल उचलतात याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे.

 

कर्जदार सभासद संभ्रमअवस्थेत
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात 1 लाख 71 हजार 300 शेतकर्‍यांकडे एक लाख रुपयापर्यत थकीत कर्ज असल्याची माहिती राज्य बँकेला देण्यात आली.आता 100 टक्के कर्ज माङ्ग या आशेवर असणार्‍या शेतकरी देखील गोंंधळणार आहेत. आपले कर्ज माङ्ग होणार की नाही, यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

LEAVE A REPLY

*