नविन कामांचे नारळ फोडतात, जुन्या कामांचे काय? चाळीसगाव न.पा.च्या विरोधकांचा सवाल

0

चाळीसगाव, | प्रतिनिधी :  नगर परिषदेमार्फत सत्ताधार्‍यांनी शहर विकास यात्रेतच्या नावाखाली विविध प्रभागातील २ कोटी ८५ लाखांच्या विकास कामांचे भुमीपूजन नुकतेच लोकप्रतिनिधी, नगारध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. सोमवार दि.२० रोजी न.पा.च्या सर्व साधारण सभेत याच विषयावर सत्ताधार्‍यांना धारेवर धरत, विरोधकांनी, तुम्ही नविन कामांच्या भूमीपूजनाचे नारळ फोडत आहात, आणि जुन कामे अजुन अपूर्णच आहेत. त्यामुळे नारळ फुटलेल्या जुन्या कामांचे काय असा कडकडीन सवाल उपस्थित करुन, वातावरण तापविले.

दुपारी ४ वा. पर्यंत चालेल्या सर्वसाधारण सभेत ९० विषयांना मजुंरी देण्यात आली. यावेळी विरोध्दकांनी काही विकास कामांच्या मुद्दांवर दुरुस्त्या सुचवल्यात. त्या सुचनांची नोंद सत्ताधारांनी करुन घेत, त्या मान्य केल्या आहेत.
चाळीसगाव नगर परिषदेची सर्व साधारण सभा दि.२० रोजी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी सभागृहात सत्ताधारी व विरोधी गटातील जवळपास सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलात पहिल्या विषयावर शहविचे गटनेते राजीव देशमुख यांनी हरकत घेतली. मागील सभेत साधर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची सुधारीत आदाज पत्रक देण्यात न आल्यामुळे या विषयाला त्यंानी जोरदार विरोध केला. यावेळी मागील सभेत विरोधकांनी सुचवलेल्या सुचनाचे अर्थसंकप्लीय अंदाज पत्रकात सुधाणा करण्यात आल्याचेे सत्ताधारांकडून सांगण्यात आले.

ठराव झालेल्या कामाचे काय?-

सभेत गटनेते राजीव देशमुख यांनी न.पा.कडून चार महिने आगोदर विकास कामबाबत ठराव झालेला आहेत, त्यांच्या वर्क ऑर्डरही (१७/१०/२०१६) झाल्या आहेत. आशी कामे का प्रलंबित आहे, असा मुद्दा उपस्थित केल असता. सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच खंडाजगी झाली यावेळी अध्यक्ष आशालता चव्हाण यंानी मजुंर झालेल्या कामाना लवकरच सुरुवात करणार असल्याचे सांगीतले.

यावेळी दलित वस्ती, ठेकेदारांना बॅल्क लिस्टमध्ये टाका, ठेकेदरांकडून कमशिन घेण्यांचा मुद्दा असे अनेक विषयांवर सत्ताधारी व विरोधाकांमध्ये तु तु-मैं मैं होऊन विषयांचे विषयातर झाल्यामुळे काही काळ सभागृहात हशा पिकला होतो. तसेच वातावरणही तग झाले होते. यामुळे संभागृहांचा अनमोल वेळ वाया गेला.

या मुद्दांवर झाली वादळी चर्चा-

दुपारी चार वाजेपर्यंत चाललेल्या सभेत विरोधी नगरसेवकांच्या प्रभागत जेसीबी स्वच्छतेसाठी जेसीबी मशिन उपलब्ध न होणे, जंतुनाशके खरेदी करणे, वाहन भाडयाने लावणे, जलतरण तलाव भाड्याने देणे, फिश मार्केट बांधकाम, प्रस्तावित हायममास्ट लॅम्प बसविणे, घनकचरा संकल, सुलभ इंटरनॉशनल यांच्या सहकार्याने शहरात सुलभ शौचाल बांधणे, न.पा.च्या न्यायालयीन कामकाज बघण्यासाठी वकीलांचे पॅनल तयार करणे, आदि विषयांवर विरोध्दकांनी हरकत घेतल्यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये बर्‍याच वेळा खंडाजगी झाली होती. शेवटी ९० विषयांना मजुंरी देत सभा आटोपती घेण्यात आली.

डेराबर्डी परिसर शहरहद्दीत समाविष्ठ करण्यांचा प्रस्ताव-

शहारपासून अवघा काही अतंराव असलेली डेराबर्डी परिसरात १०० ते १५० लोकांची वस्ती आहे. ही वस्ती धड ग्रामीण भागातही नाही व शहरी भागताही नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशी मुलभूत सुविधा पासून वंचित आहेत. त्यामुळेे हा परिसरात न.पा.च्या हद्दीत समाविष्ठ करण्यात यावा असा प्रस्ताव भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील यांनी सर्वसाधरण सभेत मांडला.

यामुळे न.पा.च्या महसूलातही भर पडणार असून तेथील नागरिकांना मुलभूत सुविधा देखील मिळणार असल्याचेे मुद्दे त्यांनी माडले. यावेळी शहरात लगत इतरही भाग का न.पा.च्या हद्दीत समाविष्ठ करण्यात येऊ नये असा मुद्दा उपस्थित केला होतो.

नगराध्यक्षाचा दुर्गाअवतार-

न.पा.च्या गेल्या तीन सभेत कमी बोलणार्‍या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, सोमवारी न.पा.च्या झालेल्या सर्वसाधारण सभेत कमालीच्या फार्ममध्ये होत्या. विरोधकांच्या अनेक मुद्दांना यावेळी त्यांनी जोरदार प्रतिकार करत उत्तरे दिलीत. तसेच शहराच्या विकास कारण्यासाठी तुम्ही-आम्ही सोबत काम करणार आहोत. त्यामुळे सभागृहाचा अवमान होणार नाही असे वर्तन करा. आणि एका वेळी एकच जण बोल असे ठणकाऊन सांगीतल्यावर अनेक नगरसेवकांच्या भुवया उंचवल्या होत्या.
न बोलणारे ही बोलू लागले !-

न.पा.च्या सोमवारची सभा विषय मजुंरीसह इतर विषयांवरही बरीच गाजली, यांचे कारण म्हणजे जे नविन व जुने नगरसेवक गेल्या तीन सभेत हाताची घडी घालुण बसलेले होते. तेही या सभेत बोलत होते. तसेच आम्हाल का बोलू दिले जात नाही, म्हंणून भांडत होत.

त्यामुळे न बोलणारे ही बोलू लागल्याने सभेत एक वेगळीच चर्चा रंगली होती. यावेळी नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी सभागृहांची सर्वांना बोलण्यंाची समान संधी आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांना सर्वांना मुक्त बोलू द्यावे आणि सभागृहांचा आदर राखावा आसा प्रस्ताव मांडला होतो.

पत्रकार गॅलेरीत घुसखोरी-

न.पा.च्या सर्वसाधरण सभेचे वातार्ंकण करण्यासाठी पत्रकार गॅलेरी बनविण्यात आली आहे. परंतू प्रत्येक सभेच्या वेळी या गॅलेरीत पत्रकार वैतिरिक्त नगरसेविकेचे पती, त्यांचे कार्यकर्त व इतर नागरिक मोठ्या प्रामाणात पत्रकार गॅलेरीत घुसखोरी करतात. त्यामुळे पत्रकारांना वार्ताकण करण्यास अडचण निर्माण असून हि पत्रकार गॅलेरी आहे की, प्रक्षेक गॅलेरी असा प्रश्‍न पत्रकारांना पडला आहे.

इतरांच्या घुसखोरीमुळे एक प्रकारे सभागृहांच्या गोपनियेताची भंग होत आहे. कारण पत्रकारान वितिरिक्त बरेच तरुण, या गॅलेरीतून सभागृहाच्या काम-काजाचे चित्रकरण करतात. सभागृहात बर्‍याच महिला सदस्या देखील आहे. गॅलेरीतील तरुणांची गर्दी व सोशल मिडियामुळे गदाचित महिलांना सदस्यांना सभागृहात प्रश्‍न उपस्थित करताना अडचण देखील वाटत असेल? तसेच सोशल मिडीयामुळेे सभागृहाती सत्ताधारी व विरोध्दकांच्या काही मुद्दयांचे वेगळे चित्र देखील बाहेर प्रसारीत केले जाऊ शकते.

पुढील न.पा.च्या निवडणुकीच्या काळात आता काढलेल्या फोटोंचा देखील वापर होऊ शकतो. त्यामुळे एकतर पत्रकार गॅलेरी बंद करुन, पत्रकारांना सभागृहात वार्ताकणासाठी बसण्याची व्यवस्था करावी, किवा पत्रकार गॅलेरीत फक्त पत्रकारच बसतील असे कडक आदेश न.पा.कडून देण्यात यावेत, अशी मागणी पत्रकारांकडून केली जात आहे.

सभागृहांचा जर आदर सत्ताधारी व विरोधकांनी ठेवायचा असेल तर सर्वांत प्रथम पुढच्या सभेत फक्त पत्रकारांनाच वार्ताकणासाठी प्रवेश दिला पाहिजे आणि इतरांचा बंदोबस्त केला पाहिजे.

LEAVE A REPLY

*