Type to search

नवापूर येथे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उद्घाटन

Share

नवापूर | येथील श्रीमती प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विशाखा समिती अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उदघाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.मिराबेन चोखावाला होत्या. उदघाटक नगराध्यक्षा हेमलता पाटील होत्या. प्रमुख अतिथी श्रीमती शितलबेन वाणी, नगरसेविका अरुणा पाटील, मंजू गावीत, बबिता वसावे, मिनल लोहार तर प्रमुख वक्ते डॉ.स्नेहल पाटील व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने करून स्वागतभेट म्हणून श्रावणमासानिमित्त बेलाचे बालतरु देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मिराबेन चोखावाा, उदघाटक हेमलता पाटील व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उदघाटन करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलतांना सौ मिराबेन चोखावाला म्हणाल्या की, स्त्री ही कुटुंबातील आधारबिंदू असल्याने तीने आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या उदघाटनपर भाषणात बोलतांना नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी शासनाच्या महिलांच्या आरोग्यासंबंधी विविध योजनांची माहिती देऊन हे मशीन उपलब्ध करून देण्यामागची भूमिका स्पष्ट केली.

प्रमुख वक्ते डॉ स्नेहल पाटील यांनी यांनी आपल्या मनोगतातून मुलींच्या शारीरिक समस्या व उत्तम आरोग्याबद्दल यथोचित मार्गदर्शन केले. शितलबेन वाणी,अरुणाताई पाटील यांनीही उत्तम आरोग्यासाठी मार्गदर्शन केले. विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून हर्षा खैरनारने सॅनिटरी मशीनची उपयोगिता सांगितली. या प्रसंगी विध्यार्थीनींची उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.एन.बर्डे यांनी केले. सूत्रसंचलन डॉ.योगिता पाटील यांनी केले. आभार जयश्री चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य मिलिंद वाघ, पर्यवेक्षक एम.जे.सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी मेहनत घेतली.

Leave a Comment

error: Content is protected !!