Type to search

नंदुरबार

नवापूर येथे रणरणत्या उन्हातही पडला कवितांचा पाऊस

Share

नवापूर । येथील म.गांधी वाचनालयाच्या सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर समिती मुंबई व काव्यप्रेमी शिक्षकमंच नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यस्पर्धा व काव्यसंमेलन उत्साहात पार पडले.

सदर संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.विजया जडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवयित्री सौ.मृदुला भांडारकर, जेष्ठ कवी माजी प्राचार्य अशोक शिंदे, जेष्ठ कवी प्रा. मुरलीधर उदावंत, अंकूर साहित्य संघ नंदुरबारचे अध्यक्ष विजय पाटील तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठान नवापूरचे अध्यक्ष विजय बागुल उपस्थित होते. शंकर साठे यांनी ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. तद्नंतर जयोस्तुते जयोस्तुते या सावरकरांच्या गाजलेल्या गीताचे सादरीकरण सौ.जया नेरे, विजया पाटील, सौ.सरला साळुंखे व सौ.जागृती पाटील यांनी केले. कार्यक्रमाचा उद्देश, स्वरूप भूमिका याबाबतची माहिती जया नेरे यांनी आपल्या प्रास्ताविकात विषद केली.

प्रा.उदावंत यांनी सावरकरांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत मनोगत व्यक्त केले. त्यांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित कवितांची स्पर्धा घेण्यात आली. यात .विजय बागूल, सौ.जागृती पाटील, अशोक शिंदे, प्रा.मुरलीधर उदावंत यांनी कवितांचे वाचन केले. बर्‍याच कवींनी सहभाग नोंदवला. यानिमित्ताने सावरकरांच्या कार्यास उजाळा मिळाला. त्यांच्या कार्याची व्यापकता एवढी आहे की शब्दात मांडून काव्यात सादर करणे शक्य नाही. कवींना आपल्या कल्पकतेने सावरकरांच्या कार्याला उजाळा मिळणार्‍या कवितांचे वाचन करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना काव्यरूपी आदरांजली वाहिली.कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात काव्यसंमेलन घेण्यात आले.

यात महेश पूरकर, अविनाश जगताप, करणसिंग तडवी, स्कालर गावीत, उज्वला वडनेरे, संगिता साळुंखे, माधवी पाटील यांनी विविध विषयांवरील कविता सादर केल्यात.तद्नंतर आपल्या अध्यक्षीय मनोगतात सौ.जडे यांनी कवितेच्या माध्यमातून, समाजापुढे असलेल्या प्रश्नांना सोडवित समाजसेवेचे, देशप्रेमाचे आवाहन केले. आभार सौ.जया नेरे यांनी मानले. सूत्रसंचलन सौ.सरला साळुंखे व विजया पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व यशस्वीतेसाठी सौ.जया नेरे, श्रीमती विजया पाटील, सौ.सरला साळुंखे, एन.वाय.नेरे, राहुल साळुंखे, कपिल नेरे, देवेन साळुंखे तसेच वाचनालयाचे ग्रंथपाल सुधीर साळुंखे, श्री.सांगळे यांनी प्रयत्न केले. काव्यसंमेलनाचा आस्वाद परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी घेतला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!