Type to search

नंदुरबार

नवापूर महाविद्यालयात साडेचार लाखांची चोरी

Share

नंदुरबार ।  नवापूर येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील कार्यालयात आज  पहाटे दोन चोरटयांनी डल्ला मारत 4 लाख 40 हजार 630 रुपयांच्या सामानाची चोरी केली. सीसीटीव्ही कॅमेरात चड्डी बनियान घातलेले दोन चोरटे कैद झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री 2 वाजून 20 मिनिटांच्यादरम्यान नवापूर येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दोन चड्डी बनियान घातलेल्या चोरटयांनी चोरी केली. महाविद्यालयाच्या कार्यालयातील 4 लाख 40 हजार 630 रुपयांचा सामान या चोरटयांनी लंपास केला आहे. महाविद्यालयाचे शिपाई विजय कुलकर्णी यांनी आज सकाळी सात वाजेच्या सुमारास महाविद्यालयाचे कार्यालय उघडले असता हा प्रकार उघडकीस आला. महाविद्यालयातील लेखा विभागाच्या दोन कपाटात चोरी झाल्याचे दिसून आले. सर्व कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेले होते. महाविद्यालयाच्या परिसरात सात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कार्यालयासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे उलटे करून चोरी केली आहे. सदर महाविद्यालयातील चोरी जाणकार व्यक्तीने केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी आठ वाजेच्या सुमारास चोरी झाल्याची माहिती नवापूर पोलीसांनी दिल्यानंतर घटनेच्या पंचनामा करण्यात आला.

कॅमेरात कैद झाले दोन चोरटे

महाविद्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात दोन चड्डी, बनियान घातलेल्या चोरट्यांचा चेहरा दिसला आहे. यावरून पोलिसांना तात्काळ चोराचा तपास घेण्यात मदत होऊ शकते. कार्यालयात संगणक साहित्य देखील चोरीला गेले असल्याची माहिती प्राचार्य ए.जी .यस्वाल यांनी दिली. साधारण 4 लाख 40 हजार 630 रुपयांच्या सामानाची चोरी केल्याचा अंदाजप्राचार्यांनी व्यक्त केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!